बिटको महाविद्यालयात 'विजय ज्योती'ला मानवंदना

बिटको महाविद्यालयात 'विजय ज्योती'ला मानवंदना

नाशिकरोड। प्रतिनिधी Nashikroad

येथील बिटको महाविद्यालयात Bytco college बुधवारी विजय ज्योतीचे आगमन झाले. एनसीसी आर्मी व एअरविंग च्या कॅडेट्सनी विजय ज्योतीचे Vijayjyot जल्लोषात स्वागत करत मानवंदना दिली. प्रभारी प्राचार्य डॉ. संजय तुपे, उपप्राचार्या डॉ. विद्युल्लता हांडे, लेफ्टनंट विजय सुकटे, फ्लाईंग ऑफिसर डॉ. आकाश ठाकूर तसेच 7 महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे 100 कॅडेट्स व 01 महाराष्ट्र एअरविंगचे 50 कॅडेट्स उपस्थित होते.

आर्टिलरी सेंटरचे ब्रिगेडियर ए.रागेश, कर्नल संजीव कोहली, कर्नल आर. के. माही, मेजर राजकुमार जसवंत, मेजर विजेंद्र मोहिते, कॅ. डिका यांच्या मार्गदर्शनाखाली 1971 इंडो-पाक युद्धावर आधारित पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या मशालीसोबत 12 सैनिकांचे पथक आले असुन 16 डिसेंबर रोजी विजयज्योत राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पोहोचणार असल्याची माहिती डॉ.आकाश ठाकूर यांनी दिली.

पाकवरील विजयाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याने शहिदांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या स्मरणार्थ चार विजय जोतीचा प्रवास देशाच्या चारही दिशांना दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकातून सुरू झाला आहे. ही विजय ज्योत नाशिकरोड येथील तोफखाना केंद्रातून बिटको महाविद्यालयात आली. युद्धात शहीद झालेल्या शूरवीरांच्या शौर्याला, शहीदांच्या स्मृतींना एनसीसी व एअर विंगच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com