मुस्लिम बांधवांचे छत्रपती शिवरायांना अभिवादन

मुस्लिम बांधवांचे छत्रपती शिवरायांना अभिवादन

नाशिक । प्रतिनिधी |Nashik

छत्रपति शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा न्यायालयासमोरील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ जॅग्वार फाउंडेशनच्यावतीने अभिवादन करण्यात आले. तसेच पाच वर्षांपासुन सतत ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे.

यावर्षी रमजान महिना चालू आहे; तरी देखील मुस्लिम समाजाचे शिवभक्त हे उपवास (रोजा) असताना उपस्थित राहून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

मुस्लिम बांधवांचे छत्रपती शिवरायांना अभिवादन
राहुल गांधींना सूरत कोर्टाचा मोठा दिलासा; जामीन मंजूर

दरम्यान, हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकर (Shahu, Phule, Ambedkar) यांच्या पुरोगामी विचारांचा आहे. इथे कुठल्याही जातीवादाला थारा नाही. असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

यावेळी जॅग्वार फाउंडेशनचे अफसर शेख, हलीम शेख, सोनू शेख, शाहा आलाम चौधरी, विक्रम गायधनी, जुनेद सैय्यद, आसिफ शेख, वारीस पठाण, दानियल शेख,आदिल शेख,उमेर शेख,आलिम सैय्यद आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com