सेल्समननेच मारला सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला

Crime
Crime

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सोनाराच्या दुकानावर (Goldsmiths shop) काम करणाऱ्या सेल्समनने दुकानातून तब्बल अडीच लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने (Gold and silver jewellery) लंपास केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वैभव अशोक भंडारी (४३,रा. फ्लॅट नंबर ५, भंडारी रेसिडेन्सी वेद मंदिराच्या मागे तिडके कॉलनी,नाशिक) यांचे कालिका मंदिराच्या बाजूला भंडारी ज्वेलर्स गॅलेक्सी प्रा.ली. शोरूम नावाने दुकान आहे.

दुकानात सेल्समन म्हणून काम करत असलेला अरुण रामदास महाजन (रा. वनराज रेसिडेन्सी फ्लॅट नंबर १, वनविहार कॉलनी, नाशिक) याने मार्च २०२२ ते २१ सप्टेंबर २०२२ या काळात त्यांच्या दुकानातील तब्बल २ लाख ४३ हजार २४१ रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास (Stolen) केले.

दरम्यान, याप्रकरणी भंडारी यांच्या फिर्यादीवरून महाजन याच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहकले (SI Sunil Rohkle) यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर.व्ही.सोनार करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com