रोपवाटिकात विदेशी प्रजातींची रोप विक्री
नाशिक

रोपवाटिकात विदेशी प्रजातींची रोप विक्री

कारवाईसाठी आ. सीमा हिरे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Abhay Puntambekar

सातपूर । प्रतिनिधी Satpur

शासनाच्या स्पष्ट सूचनांची कार्यवृत्तात नोंद घेतलेली असताना आणि वेळोवेळी चर्चेमध्ये स्पष्ट केलेले असताना ज्या अधिकार्‍यांनी शासनाच्या सूचनांची पायमल्ली केली आहे, अशा क्षेत्रीय व पर्यवेक्षीय अधिकार्‍यांविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यासंदर्भात प्रस्तावावर तातडीने प्रक्रिया करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी आ. सीमा हिरे यानी मुख्यमंत्री व जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

शासनाच्या ५० कोटी वृक्षारोपण व संगोपन कार्यक्रमांतर्गत रोपवाटिका निर्मितीचा कार्यक्रम व सामाजिक वनीकरण आणि एफडीसीएम यांच्यामार्फत २०१६ पासून घेण्यात येत आहे. उच्च दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रोपे वन विभागांच्या विविध रोपवाटिकांमधून उपलब्ध करण्याबाबत वेळोवेळी प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या आहे. त्याचप्रमाणे जनतेकडून आलेल्या सूचनांनुसार रोपवाटिकांमध्ये विदेशी व शोभेच्या वृक्ष प्रजातींची रोपे तयार करु नयेत अशा सूचना प्राप्त झाल्या होत्या. कारण पशूपक्ष्यांना अधिवास निर्माण करणे, नैसर्गिक अन्न साखळी राखणे आणि त्यातून जैवविविधता वाढवणे व टिकवणे हे उद्दिष्ट सफल करण्यासाठी स्थानिक प्रजातीची फळ देणारी झाडे मोठ्या प्रमाणात लावावीत असा निर्णय घेण्यात आला होता.

या आकडेवारीनुसार विदेशी व शोभेच्या झाडांची संख्या बरीच मोठी असल्याचे दिसून येते. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड गैरसमज पसरण्यास वाव निर्माण झाला आहे. याबाबत शासनाच्या स्पष्ट सूचना असताना, अशा प्रकारची रोपे कोणत्या रोपवाटिकामध्ये तयार केली गेली व कोठे वितरीत केली गेली याबाबतची माहिती सादर करावी. त्याचबरोबर ज्या अधिकार्‍यांनी शासनाच्या सूचनांची पायमल्ली केली आहे, त्याअधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची मागणी आ. सीमा हिरे यानी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सन २०१७ पासून ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत दरवर्षीच्या उद्दिष्टांसंदर्भात वन विभागाच्या रोपवाटिकांमध्ये गुलमोहर, अकेशिया, काशिद, सप्तपर्णी, पेल्टोफॉर्म इ. झाडे तयार करण्याबाबत व कोणत्याही विभागांना वितरीत करू, नयेत अशा सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे क्षेत्रीय अधिकार्‍यांकडून कार्यवाही अपेक्षित होती. वन व समाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटीकांमधून विदेशी झाडे तयार केली असून त्याचे केवळ वितरण केले जात नसून त्यांची विक्री होत असल्याने नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com