आयमा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्जांची विक्री

आयमा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्जांची विक्री

सातपूर । प्रतिनिधी Satpur

अंबड इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (आयमा)च्या निवडणुकीच्या AIMA Elections प्रक्रियेत उमेदवारी अर्ज विक्रीला गुरुवारी सुरुवात झाली. मात्र दुसर्‍याच दिवशी मकरसंक्रांतीच्या Makarsanranti मुहूर्तावर दोन्ही गटांकडून 65 अर्जांची विक्री करण्यात आली आहे. त्यामुळे एकता पॅनलविरोधात उद्योग विकास पॅनलची सरळ लढत आयमात रंगण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

यंदा 1956 मतदार असून 450 सदस्य प्रथमच मतदान करणार आहेत. उद्योग विकास पॅनलकडूनही बैठका सुरू असून उमेदवार निश्चितीला वेग आला आहे. एका बाजूला बैठका जोमात सुरू झाल्या आहेत.एकता पॅनलकडून 30 जागांसाठी 40 उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली असून काल उमेदवारी अर्ज घेताना 35 अर्ज घेतल्याचे समोर आले आहे.

तर उद्योग विकास पॅनलकडून 30 जागांसाठी 30 अर्ज घेण्यात आले. शुक्रवारी मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर दोन्ही गटाकडून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ करण्यात आला. अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नसल्याचे वृत्त आहे.

आयमाकरता अंबड, गोंदे, सिन्नर, सातपूर या औद्योगिक वसाहतीतील 1956 मतदार मतदान करणार आहेत. यापैकी जवळपास साडेचारशे मतदार नवीन असून ते पहिल्यांदाच निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

एकता पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार निखिल पांचाळ, मानद सचिवपदाचे उमेदवार ललित बूब यांच्यासह पॅनलमधील इतर 30 जागांसाठी 35 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. माघारीनंतर यातील 30 अर्ज अंतिम केले जातील. उद्योग विकास पॅनलच्या बैठकीला ‘निमा’चे माजी अध्यक्ष शशिकांत जाधव, तुषार चव्हाण, पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार संजय महाजन, एन. डी. ठाकरे, बाळासाहेब गुंजाळ आदींसह सदस्यांच्या बैठकीत 30 उमेदवारांची अंतिम यादी निश्चित करण्यात आली आहे.

उद्योग विकासचा दुरूस्त यादीसाठी अर्ज

निवडणूकीत करोना प्रादुर्भाव असल्याने मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधणे कठीण आहे. त्यासाठी मागवण्यात आलेल्या मतदार यादीतील मतदारांचे फोन नंबर चूकीचे असून, त्यातील पत्ते देखिल अर्धवट असल्याने दुरूस्त मतदार यादी देण्यात यावी अशी मागणी करणारा अर्ज उद्योग विकास पॅनलच्या वतीने निवडणूक अधिकार्‍यांना देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com