
नाशिक । Nashik
एकरी 25 क्विंटलच्या आसपास उत्पादन असलेल्या तसेच आरोग्य वर्धक, कॅन्सर, कोलेस्ट्रोल, मधुमेह यासारख्या आजारांवर नियंत्रण ठेवणारा आरोग्य वर्धक ब्लॅक राईस (तांदूळ ) च्या बीपीटी 2841 या बियाण्याची विक्री ब्रह्मा ऍग्रो फार्मिंग यांच्याकडे शुक्रवार (दि.१४)पासून सुरू होणार आहे, अशी माहिती राजाराम पाटील पानगव्हाणे यांनी दिली.
मागील वर्षी अंजनेरी, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी असलेल्या शेतामध्ये बी.पी.टी -2841 या ब्लॅक राईस भाताची 11 एकर मध्ये लागवड करण्यात आली होती. एकरी 25 क्विंटलची आसपास या भाताचे उत्पादन झाले असून हया भाताच्या सत्यप्रत म्हणून बियाण्याची विक्री सुरु करीत आहोत. साधारणपणे 100 ते 110 दिवसात भात काढणीस येतो व एकरी 25 ते 30 क्विंटल पर्यंतचे उत्पादन येऊ शकते.हा तांदूळ आरोग्य वर्धक असून कॅन्सर, कोलेस्ट्रोल, मधुमेह या सारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यात हा तांदूळ चांगला आहे.
या तांदळामध्ये इतरही अँटीजन गूण सत्व आहेत. या भाताची सेंद्रीय पध्दतीने पिक घेतल्यास देशात 250 ते 350 रुपये प्रति किलोने सहज विकी होते व परदेशामध्ये 700 ते 900 रुपये पर्यत प्रति किलो दर मिळतो. हा भात आरोग्यवर्धक असल्याने देशात व परदेशामध्ये मोठया प्रमाणावर तांदळाची मागणी आहे. आपल्या भागामध्ये बी.पी.टी -2841 ही ब्लेक राईस प्रजातीची मागील वर्षी बियाणे मिळाल्यानंतर जवळपास 250 क्विंटल बियाने विक्री साठी तयार झाले आहे. या बियाण्याची उगवण क्षमता चांगली असून शेतकऱ्यांसाठी नाशिक जिल्हा एक नवीन वाण या पुढे भात पिकवण्यासाठी मिळालेला आहे.
तांदूळ + अन्न = ब्लॅक राईस हे आरोग्य वर्धक अन्नाचा भातापासून लोकांना मिळणार आहे. अमेरिका व मध्यपूर्व देशामध्ये व युरोपमध्ये या भातास मोठया प्रमाणावर मागणी आहे.
ब्रम्हा ऍग्रो फार्मिंग या शेतकरी ग्रुप तर्फे या वाणाची लागवड करण्यासाठी शेतक-याच्या ग्रुप तयार करण्यात येणार असून शेतक-यांना या भात पिकासाठी लागवडी पासून तर भात काढणी पर्यंत तंत्रज्ञान या ग्रुपच्या वतीने दिले जाणार आहे व पिकवलेला भात सूध्दा या गुपतर्फे खरेदी केला जाणार असून शेतक-यांना निश्चितच चांगला फायदा होईल असेही पानगव्हाणे यांनी सांगितले आहे.वाढते आजार बघता आरोगयासाठी अन्न + औषध = ब्लॅक राईस हे चांगले आरोग्य वर्धक समीकरण निर्माण झाले आहे.
या भात शेती करणा-या शेतक-यांना वरील बियाणे हवे असल्यास त्यांनी ब्रम्हा व्हॅली शैक्षणिक संकूल 'शेजारील गट नं. 593 या अंजनेरी ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक येथे प्रत्यक्ष अथवा फोनवर संपर्क साधावा, असेही पानगव्हणे यांनी सांगितले आहे.