Nashik News : आमदार सीमा हिरेंच्या कार्यालयाबाहेर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची निदर्शने

राजीनाम्याची केली मागणी
Nashik News : आमदार सीमा हिरेंच्या कार्यालयाबाहेर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची निदर्शने

नाशिक | Nashik

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न राज्यात चांगलाच पेटला असून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने, उपोषण सुरु केली आहेत. तसेच राज्यभरात मराठा आंदोलकांनी (Maratha Agitators) राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली असून अनेक पक्षातील कार्यकर्ते आणि नेते यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे...

Nashik News : आमदार सीमा हिरेंच्या कार्यालयाबाहेर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची निदर्शने
Nashik Crime News : बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना अटक; काय आहे प्रकरण?

तर काही ठिकाणी मराठा आंदोलकांनी आमदारांचे घर, गाड्या जाळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता नाशिकमध्ये (Nashik) देखील मराठा समाज (Maratha Community) आक्रमक झाला असून सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे (MLA Seema Hiray) यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी बाळासाहेब गीते,संजय भामरे,आशिष हिरे,सुनील जगताप,विजय पाटील,पवन मटाले, योगेश गांगुर्डे, प्रितम भामरे,अमित खांडे, श्याम पाटील, दिनेश नरवडे, ज्ञानेश्वर कोतकर,सागर पाटील,अक्षय पाटील, उपस्थित होते.

Nashik News : आमदार सीमा हिरेंच्या कार्यालयाबाहेर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची निदर्शने
Maratha Reservation : मुख्यमंत्री शिंदेंसोबत काय चर्चा झाली? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

दुसरीकडे बीड जिल्ह्यात काल मराठा आंदोलकांनी आमदारांच्या (MLA) घरावर केलेली दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. नाशिकमध्ये पोलिसांनी (Police in Nashik) आमदारांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली असून राजकीय पक्षांच्या कार्यालयाबाहेर सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik News : आमदार सीमा हिरेंच्या कार्यालयाबाहेर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची निदर्शने
Maratha Reservation : मराठा आंदोलनाचा 'लालपरी'ला फटका; अनेक ठिकाणी बससेवा ठप्प
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com