Video : संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रातिनिधिक स्वरुपात प्रस्थान

वारकर्‍यांमध्ये उत्साह; १९ जुलैला बसने पालखी जाणार पंढरपूरकडे
Video : संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रातिनिधिक स्वरुपात प्रस्थान

नाशिक । प्रतिनिधी

संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीने पौर्णिमेच्या मुहूर्तावर आज (दि २४) त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रातिनिधिक स्वरुपात प्रस्थान केले. करोना संकटामुळे वारी यंदाही होणार नसली तरी या सोहळ्यासाठी वारकर्‍यांमध्ये प्रचंड उत्साह आहे....

सर्व छायाचित्रे : मोहन देवरे, त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी

दरवर्षी आजच्याच दिवशी निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते. त्र्यंबकेश्वर, सिन्नर, नगर मार्गे सोलापूराकडे पालखी मार्गक्रमण करते. मात्र करोना संकटामुळे त्रंबकेश्वरच्या निवृत्तीनाथ महाराज पालखीचा प्रातिनिधिक प्रस्थान सोहळा आज निवृत्तीनाथ मंदिरातच पार पडला.

दरवर्षी आजच्याच दिवशी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्रंबकेश्वर वरून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत असते. मात्र कोरोनाच्या पार्शवभूमीवर यंदा वारी सोहळा रद्द झाल्याने मंदिराच्या आवारातच हा प्रातिनिधिक प्रस्थान सोहळा पार पडला.

सोहळा प्रातिनिधिक असला तरी वारकऱ्यांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत होता. निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीची नित्य पूजा केली जाणार असून 19 जुलै रोजी शासन निर्णयानुसार पालखी बस मधून ठराविक वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूर कडे प्रस्थान करणार असल्याची माहिती माजी अध्यक्ष हभप संजय महाराज धोंगडे यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com