साईनगर शिर्डी ते हावडा विशेष रेल्वेगाडी

साईनगर शिर्डी ते हावडा विशेष रेल्वेगाडी

नाशिकरोड । प्रतिनिधी

साईनगर शिर्डी ते हावडा आणि मुंबई ते गोरखपूर दरम्यान मध्य रेल्वेने साप्ताहिक विशेष अतिजलद गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

साईनगर शिर्डी ते हावडा विशेष गाडी साईनगर शिर्डी येथून 19 जून आणि 26 जूनला 14.10 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी हावडा येथे 19.30 वाजता पोहोचेल. हावडा येथून ही गाडी 17 जून आणि 24 जूनला 14.35 वाजता सुटेल आणि साईनगर शिर्डी येथे दुसर्‍या दिवशी 19.10 वाजता पोहोचेल.

कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खडगपूर येथे ती थांबेल.

मुंबई ते गोरखपूर गाडी गोरखपूरहून 16 जूनला 19 वाजता सुटेल व मुंबई एलटीटी येथे तिसर्‍या दिवशी 05 वाजता पोहोचेल. एलटीटीहून ही गाडी 18 जूनला 7.50 वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसर्‍या दिवशी 16.15 वाजता पोहोचेल. कल्याण, नाशिकरोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, चित्रकूट धाम, बांदा, रागौल, भरूआ सुमेरपूर, कानपूर सेंट्रल, ऐशबाग, गोंडा, बस्ती आणि खलीलाबाद येथे ही गाडी थांबेल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com