सायखेडा गट राखीव; मातब्बरांंचा हिरमोड

सायखेडा गट राखीव; मातब्बरांंचा हिरमोड

म्हाळसाकोरे । कृष्णा अष्टेकर | Mhalsakore

तालुक्यात राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असलेला गोदाकाठच्या सायखेडा (Saykheda) जिल्हा परिषद (zilha parishad) गटाचे आरक्षण (reservation) अनु. जमातीसाठी राखीव झाल्याने अनेक मातब्बर इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

सायखेडा जि.प. गटाच्या मागील निवडणुकीवर (election) एक नजर टाकली असता हा गट आत्तापर्यंत काँग्रेस (Congress), राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली राहिला आहे. शिंगवे येथील दिगंबर गिते यांनी दोन पंचवार्षिक तर अडीच वर्ष जि.प. चे उपाध्यक्षपद भोगले आहे. सन 2012 मध्ये ही हा गट अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव होता. त्यामुळे तत्कालिन भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाण (BJP MP Harishchandra Chavan) यांच्या अर्धांगिण कलावती चव्हाण यांनी येथून उमेद्वारी करीत या गटाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

तर मागील पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे डॉ.प्रल्हाद डेर्ले (Shiv Sena's Dr.Pralhad Derle in the five-year election), राष्ट्रवादीचे सुरेश कमानकर, भाजपचे डॉ.जगन्नाथ कुटे, काँग्रेसचे दिगंबर गिते, मनसेचे किरण सानप आदींनी नशिब आजमावले होते. यात राष्ट्रवादीचे सुरेश कमानकर विजयी झाले होते.

परिणामी आत्ताची जि.प. ची निवडणूक विचारात घेता शिवसेनेकडून गोकुळ गिते, खंडू बोडके, डॉ.प्रल्हाद डेर्ले तर राष्ट्रवादीकडून वसंत जाधव, राजेंद्र सांगळे, धोंडीराम रायते, संतोष बाजारे तर भाजपकडून आदेश सानप, डॉ.सारिका डेर्ले, जगन्नाथ कुटे तर काँग्रेसकडून दिगंबर गिते, मनसेकडून किरण सानप, प्रहारकडून दत्ता आरोटे यांनी जनसंपर्क वाढविला होता.

साहजिकच मागील वर्षापासून या इच्छुकांनी गटातील मतदारांच्या गाठीभेटीसह गटातील प्रत्येक गावात असणारे अंत्यविधी (funeral), दशक्रिया विधी, वर्षश्राद्ध, घरभरणी, लग्न समारंभ आदी कार्यक्रमांना हजेरी लावत शेतकर्‍यांचे ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधण्याबरोबरचे रस्ते (road), वीज (Electricity), पाणी (water) या प्रश्नांना हात घालत मतदार संघात लोकसंपर्क वाढविण्यावर भर दिला होता. मात्र नुकत्याच निघालेल्या आरक्षणात हा गट अनु. जमातीसाठीं राखीव झाल्याने या इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फिरले गेल्याने आता अनेकांनी आपला मोर्चा पंचायत समिती (panchayat samiti) तसेच बाजार समिती निवडणुकीकडे वळविला असून त्यादृष्टीने व्यूहरचना सुरू केली आहे.

एकूणच जि.प. ची निवडणूक (election) विचारात घेता अनेकांनी आत्तापासूनच खर्च करण्यास सुरुवात केली होती. मात्र आता या इच्छुकांवर पक्षासाठी उमेद्वार शोधण्याची वेळ आली आहे. तर गटातील आरक्षणामुळे हॉटेल, ढाबे, पानटपरी, बॅनर बनविणारे यांच्या मधून देखील नाराजीचा सूर उमटू लागला आहे. त्यामुळे यावेळची जि.प. ची निवडणूक कमी खर्चात होण्याचे संंकेत मिळू लागले आहे.

गटाप्रमाणेच सोनगाव गण देखील अनु.जमाती महिला राखीव झाला आहे. त्यामुळे आता इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या सायखेडा गणावरच इच्छुकांनी लक्ष केंद्रीत केले असून गोदाकाठ मधील सर्वाधिक आर्थिक उलाढाल गटापेक्षा सोनगाव गणातच होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या गणातून नशिब आजमाविण्यासाठी अनेकांनी आत्तापासूनच व्यूहरचना सुरू केली आहे. एकूणच दुधाची तहान ताकावर भागविण्यासाठी इच्छुक उमेद्वार तयारी करीत असल्याचे चित्र सायखेडा गणात दिसू लागले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com