नाशिक । Nashik

नाशकात होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनासाठी अप्लिकेशन आणि वेबसाईट विकसित करण्यात आली आहे.

या माध्यमातून येणाऱ्या साहित्यिकांना रसिकांना माहिती उपलब्ध होईल अशा अनुषंगाने हे दोन्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्यात येणार आहे. पुढील दोन दिवसांत सोशल मीडियाद्वारे संमेलनाच्या प्रत्येक घडामोडीचे अपडेट्स दिले जाणार आहेत.

याबाबतची बैठक रविवार दि. १४ रोजी संपन्न झाली. दरम्यान या बैठकीत अप्लिकेशन आणि वेबसाईट संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अप्लिकेशन व वेबसाईटवर संमेलनाच्या ठिकाणी विविध मार्गावरून येताना आवश्यक मॅप्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

याशिवाय मुख्य व्यासपीठ, पुस्तक प्रदर्शन, प्रसाधन गृह याबद्दलचे नकाशे व्हीडीओ स्वरुपात माहिती उपलब्ध केली जाणार आहे. तसेच पुढील दिन चार दिवसांत संमेलनाचे सर्व अपडेट्स दिले जाणार आहेत. यानिमित्त विविध माध्यमातून संमेलनाशी निगडीत सेलिब्रिटी, जेष्ठ साहित्यिकांचा संवाद घडवून आणला जाणार आहे.

तसेच नाशकातील विविध पर्यटनस्थळांची माहिती या माध्यामतून दिली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र पर्यटन मंडळाची विशेष मदत घेतली जाणार आहे.