साहित्य संमेलन हा राजकीय आराखडा होऊ नये : देवयानी फरांदे

साहित्य संमेलन हा राजकीय आराखडा होऊ नये : देवयानी फरांदे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकमध्ये होऊ घातलेले मराठी साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) हा राजकीय आराखडा होऊ नये, असे मत भाजपच्या मध्य नाशिकच्या आ. देवयानी फरांदे (Devyani Farande) यांनी व्यक्त केले...

मराठी साहित्य संमेलनाची उच्च परंपरा असून नाशिकमध्ये होऊ घातलेल्या मराठी साहित्य संमेलनात देखील या परंपरांचे पालन केले जावे. मराठी साहित्य संमेलन हा राजकीय आखाडा होऊ नये, नाशिक ही साहित्यिकांची भूमी आहे. कुसुमाग्रजांपासून सावरकरांपर्यंत, वसंत कानेटकरांपासून आजच्या लेखकांपर्यंत सर्वांचे योगदान साहित्य क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे आहे.

मराठी साहित्य संमेलनासाठी तयार करण्यात आलेल्या शीर्षक गीतात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव टाळण्याच्या झालेल्या प्रकरणाबाबत मत व्यक्त करताना आ. फरांदे यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान अद्वितीय होते. त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्रातही त्यांचे योगदान फार मोठे होते. त्यामुळेच त्यांना 21 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करण्यात आले होते. तसेच मराठी भाषेतील अनेक नवीन शब्द ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची मराठी भाषेला देण आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com