Live साहित्य संमेलन : डॉ. रामदास भटकळ यांची प्रकट मुलाखत

प्रकट मुलाखत : डॉ. रामदास भटकळ

मुलाखतकार : डॉ. चंद्रकांत पाटील / दिलीप माजगांवकर

नाशिक / कुसुमाग्रज नागरी | टीम देशदूत Nashik / Kusumagraj Nagari | Team Deshdoot

रामदास भटकळ Ramdas Bhatkal ही एका प्रकाशकाची कथा नसून, त्यांच्यातल्या लेखक, नाटककार व गांधी तत्वांचे अनुकरण करणार्‍या समृद्ध संपादक प्रकाशकाची कथा असल्याचे प्रगट मुलाखतींमधून अधोरेखीत होते आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या 94th Marathi Literary Convention निमित्ताने आयोजित प्रगट मुलाखतीत रामदास भटकळ यांच्याशी राजहंस प्रकाशनचे Rajhans Prakashan दिलीप माजगावकर Dilip Majgaonkar, साहित्यिक डॉ. चंद्रकांत पाटील Dr. chandrakant Patil यांनी संवाद साधला.

वयाच्या 17 व्या वर्षापासून प्रकाशन क्षेत्राशी संपर्क आला.केवळ प्रकाशक म्हणून काम केले नाही किंवा व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहिले नाही. वांडमय नाटक संगीत अशा विविधरंगी क्षेत्रांमध्ये विशेष योगदान दिले आहे.

प्रकाशन या क्षेत्रामध्ये वयाच्या 17 व्या वर्षी प्रवेश केल्यानंतर वयाच्या साठाव्या वर्षी लेखक म्हणून लिहायला प्रारंभ केला. वयाच्या ऐंशीव्या वर्षी संगीताची साधना सुरू केली. केवळ इंग्रजी येत होते ते मराठीमध्ये गांधीवादाचे विचार मांडण्यामध्ये नेहमी अग्रक्रम ठेवला होता. लेखकांच्या माध्यमातून मराठी साहित्याचा अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून इंग्लंडमध्ये विशेष अभ्यास करण्यासाठी गेलो. संस्था कशी चालवायची याचा जास्त अभ्यास केला. आपल्याकडे वंशपरंपरेने व्यवसाय करण्याची पद्धत आहे. परंतु पॉप्युलर ग्रुपने संस्था म्हणून काम करण्यास प्रारंभ केला.

1961 मध्ये जेव्हा परत आलो तेव्हा आपली बांधिलकी कशी जपावी याचें शिक्षण घेतलें. काम करणार्‍या प्रत्येक अपेक्षा आपल्याला जास्त माहिती असणे गरजेचे आहे हे अधोरेखित करून ठेवले. करोना महामारीच्या अगोदर शंभरहून जास्त लोक कामाला होते. आता सतरा लोकांवर पॉप्युलर पब्लिकेशनचे काम चालू आहे. वीस ते पंचवीस वर्षांपासून काम केलेली माणसे, त्यांची विचार धारणा पक्की आणि संस्था म्हणून ते काम करीत असतात. सर्वेसर्वा म्हणून काम न करणे, इतर सर्वांची संस्था म्हणून काम करणे हीच भूमिका जोपासली.

अनेक लेखकांच्या पुस्तक प्रकाशनाच्या माध्यमातून दिशा देण्याचेही काम केले.वसंत कानेटकर यांची एक आठवण सांगताना ते पूर्वी लेख लिहीत होते मात्र त्यांच्या लेखांमध्ये संवादाची पकड चांगली असल्याचे सांगून त्यांना नाटक लिहिण्यास प्रवृत्त केले आणि त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. कानेटकर, तेंडुलकर मौज प्रकाशनांचे चाहते होते.त्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न कधीच केलां नाही. प्रत्येक वेळी इच्छा असायची कधी या लोकांनी त्यांचे लेख आपल्याकडे द्यावेत मात्र एकदा तेंडुलकरांनी पत्र लिहून माझी कादंबरी प्रकाशित करायला तुम्हाला शक्य आहे का ?अशी विचारणा केली.कालांतराने त्यांचे लेखन प्रसिद्धीसाठी पॉप्युलर कडे येऊ लागले. पुढे त्यांची 29 नाटकं प्रसिद्ध केली.

आपल्या लेखन व संपादन क्षेत्रातील ज्ञानाबद्दल बोलताना म्हणाले की, श्री.कृ.हे शिस्तप्रिय संपादक होते व भ.वि.मोटे हे अत:प्रेरणा जपणारे होते.या दोघांच्या बाजूला बसून त्यांचे कौशल्य अनुभवण्याची संधी मिळाली. त्यावेळी छपाईचे तंत्रज्ञान होते. सत्यकथा असल्याने साहित्यिक बाजू होती.महाविद्यालयापेक्षा मी जास्त मौज यामध्येच थांबत होतो. त्यावेळी विष्णुपंत हे मोठे प्रकाशक होते. विक्रीकडे त्यांचे लक्ष असायचें. त्यांनी शिकवताना संपादकीय स्वातंत्र्य दिले असल्याने त्यांच्या लिखाणातून स्पष्टपणे दिसून येते. त्या माध्यमातून संपादनाचे धडे गिरवले आणि लिखाण समृद्ध झाले. माझ्या लेखनाकडे श्री. कृ. यांनी फारसे लक्ष दिले नाही. त्यांच्या लेखी शिकाऊ पत्रकार होतो. पुढे त्यांनी माझ्या लेखनाला योग्य दिशा देत मार्गदर्शन केले.

माजगावकर म्हणाले,रामदास भटकळ यांच्या विचारांवर गांधीवादाचा फार मोठा पगडा आहे. ज्ञानेश्वरी आणि गांधीवाद केवळ वाचलाच नाही तर गांधी गुणांवर ते जगले. साधेपणा, सेवावृत्ती त्यांनी जोपासली. आपल्यापेक्षा इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमी केलेला आहे. गांधीजींना भेटण्याची संधी मिळाली होती. गांधीजींनी भेटण्यासाठी चार वाजताची वेळ दिली होती.मात्र ही वेळ व्यवसायाची असल्याने आपणास भेटणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे कळवले. गांधीजींना ते खूप रुचले. पुढे त्यांची भेटही झाली. गांधीजींच्या विचारांचा प्रचंड पगडा असल्याने त्यांच्या बद्दल लिखाण करण्याचे स्वप्न मनाशी बाळगलेले आहे. देशाच्या इतिहासातील गांधी आणि सावरकर, गांधी आणि आंबेडकर, गांधी आणि जीना असे अनेक लिखाण झाले आहेत. सावरकर हिंदूंचे दलित समाजाचे आंबेडकर तर मुस्लिम समाजाचे जिना असे समीकरण होते.या तिघांनी ब्रिटिशांची मदत घेतली मात्र गांधीजी लढाई लढले होते. यातून गांधी प्रमाण वाढले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रत्यक्ष इतिहासाची पाने उलटताना लहानपणापासून व्यवस्थेची गोडी लागली होती. वयाच्या 87 व्या वर्षी पुस्तकं विकायची ती पुस्तकांच्या गुणवत्तेवर. त्यामुळेच मासिक, साप्ताहिक काढले नाही. जाहिरातीच्या आधारावर अवलंबून राहायचे नाही हे आपल्याला करायचे नव्हते. त्यामुळे आपलें जे काही होईल ते होऊ द्या अशी भूमिका कायम ठेवली होती. आपला व्यवसाय संस्था म्हणून चालवायचा, नफा कमावणे हा उद्देश नाही ही भूमिका ठेवल्यामुळे आमची कंपनी खर्‍या अर्थाने पॉप्युलर झाली. वयाच्या सत्तराव्या वर्षी गांधीजींचा अभ्यास करणारा, संगीतकला जपणारा, आजच्या राजकीय घडामोडीवर जागरूकतेने प्रखर विचार मांडणारा मनमोकळ्या व्यक्तिमत्त्वाची ही ओळख या चर्चेतून मिळाली.

सूत्रसंचालन हेमंत टकले यांनी केले. उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com