त्र्यंबकेश्वर । Trimabkeshwer

त्र्यंबकेश्वर नगरीच्या उपनगराध्यक्षपदी तरुण नगरसेवक सागर उजे यांची बिनविरोध निवड झाली आहे

उपनगराध्यक्ष सौ. माधवी भुजंग यांनी रोटेशन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त पदावर सागर उजे यांची निवड करण्यात आली. उजे हे भाजपचे नगरसेवक आहेत.

नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी तसेच नगरपालिका विषय समित्यांचे सभापती व नगरसेवक व भाजप पदाधिकारी यांनी उजे यांचे अभिनंदन केले. तसेच या निवडीचे स्वागत युवक वर्गाकडून जल्लोषात करण्यात आले