
नाशिक । नरेंद्र जोशी Nashik
शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी नाशिकच्या लोकप्रतिनिधींंनी पुढाकार घेइून सामान्य नागरिकांना ग्रीन जिम ( Green Gym)उपलब्ध करुन दिली खरी, मात्र तिची कायम ऑईल, ग्रीस लावून देखभाल दुरुस्तीसह कायम लक्ष्य ठेवण्यासाठी उपायोजनाच न केल्याने ग्रिनजीमला गंज चढू लागला आहे.
गेल्या पंधरा वर्षांत नाशिक महानगरातील उद्यानात खुल्या ङ्गग्रीन जिमम सुरू झाल्या. सुरुवातीला अनेकाना त्या आवडल्या. आमदार, खासदारांनंतर नगरसेवकही त्यासाठी निधी उपलब्ध करुन देऊ लागले. त्यामुळे नाशिक पश्चिम प्रभागात (Nashik West Division )प्रत्येक उद्यानात ग्रीन जीम बसवल्या.
या ग्रीन जिमच्या माध्यमातून नागरिकांना व्यायामाची सवय लागलीे. महिलांसह ज्येष्ठ नागरिक, युवकांना व्यायामाचे महत्त्व पटले, व्यायामासाठीचे साहित्य त्यांना सहज उपलब्ध झाल्याने खर्च वाचला. प्रमोद महाजन, उद्यान, कृषीनगर, जॉॅगिंग ट्रॅक, गोल्फ क्लब मैदान, जिल्हाधिकारी कार्यालय कॅम्पस येथे प्रसन्न वातावरणात नागरिकांना व्यायामाचा आनंद घेता आला.
मुंबई- पुणे शहराची मक्तेदारी असलेली खुली ग्रीन जिम ही संकल्पना नाशिक शहरात प्रत्यक्षात साकारली. मात्र आता नव्या जीमसाठी निधी उपलब्ध होत नाही. नहेमीच्या वापरानंतर काही जिमचे सुटे भाग ढिले झाले आहेत. ते वेळीत दुुुरुस्त होत नसल्याने त्यावर व्यायाम करणे म्हणजे दुखणे लावून घेण्यासारखे होत आहे.
कमी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या ग्रीन जिमची समाजकंटकांकडून मोडतोेड झाली आहे. देखभाल, दुरुस्ती केली जात नसल्याने छोट्या तुटफुटीचे परिवर्तन भंगारात होत आहे. अनेक उद्यानांमध्ये साहित्य तुटलेल्या अवस्थेत उभे आहेत. काही ठिकाणी संपूर्ण साहित्य उखडून पडले आहे. काही ठिकाणी गवत वाढते. सांडपाणी साचते, डास वाढताता, ग्रीन जिमच्या तुटक्या साहित्यामुळे चाांंगल्या कामासाठा झालेला खर्च पाण्यात जातांना दिसतो. त्यातून नाराजी व्यक्त होत. म्हणूनच ग्रीनजीमची कायम देखभाल दुरुस्तीसाठी यंत्रणा उभी करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
ज्या ठेेकेदारांना ग्रीनजीमचे काम दिले त्यांनीच पाच वर्षे त्याची देखभाल दुरुस्तीही सक्तीची केली पाहिजे. कारण बर्याच जीम सध्या ऑईल व ग्रीस न लावल्याने निकामी झाल्या आहेत. असून अडचण, नसून खोळंबा सारखी अवस्था आहे. केवळ सांगाडे उभे करुन ठेेवण्यात काही अर्थ नाही. उलट त्यामुळे ज्यांच्या निधीतून जीम बसवल्या, त्यांचीच बदनामी होते. योजना चांगली आहे तर चांगल्या प्रकारे राबवलीही गेली पाहिजे.
बापू शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, गंंगापूररोड