ग्रामीण डाकसेवक 'इतके' देशव्यापी संप

ग्रामीण डाकसेवक 'इतके' देशव्यापी संप

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

ग्रामीण डाकसेवकांना (rural postal workers) कायम करावे, यासह अन्य मागण्यासाठी दि.१६ व १७ रोजी देशव्यापी संपाची (Nationwide strike) हाक दिली आहे.

या संपात देशातील २ लाख ४० हजार जिल्ह्यातील ३७८ सेवकांचा समावेश आहे. ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियन (All India Rural Post workers Union) व नॅशनल युनियन ग्रामीण डाक सेवक (National Union Rural Post Workers) या संघटनांच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारण्यात आला आहे.

या सेवकांना १० ते १५ हजार रुपये वेतन देण्यात येते. १० ते २० वर्षे सेवा करूनही कायम केले जात नाही. पगार, बोनस आणि महागाई भत्ता (Salary, bonus and dearness allowance) व्यतिरिक्त कोणती सुविधा नाही. त्यामुळे हा संप - पुकारण्यात आला आहे.

टीआरसीएप्रमाणे (TRCA) वेतन मिळावे, ग्रामीण डाकसेवकांच्या रजेच्या काळात बदली कर्मचाऱ्यांना लावण्याची परवानगी देण्यात यावी. ग्रॅच्युइटी (Gratuity) दीड लाखऐवजी पाच लाख करण्यात यावी. वैद्यकीय सेवा देण्यात याव्यात, सामुदायिक विमा पाच लाख रुपये करण्यात यावा.

एसडीबीएस पेन्शन योजनेत (SDBS Pension Scheme) वाढ करावी, या मागण्यांचा समावेश आहे. ग्रामीण डाकसेवकांनी सहभागी होऊन संप यशस्वी करावा, असे आवाहन राजाराम जाधव, कृष्णा गायकवाड, सुनील जगताप व शकील सय्यद यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com