ग्रामिण भागात बसची प्रतिक्षा कायम

ग्रामिण भागात बसची प्रतिक्षा कायम

निफाड । प्रतिनिधी | Niphad

करोना प्रादूर्भावामुळे (corona outbreak) गेल्या दोन वर्षापासून बंद पडलेली परिवहन महामंडळाची बससेवा (Transport Corporation bus service) आता करोना प्रादूर्भाव कमी झाला असला तरी देखील अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे ही बससेवा (bus service) त्वरीत सुरू करून शालेय विद्यार्थी (students), चाकरमाणी व प्रवाशी यांना न्याय द्यावा अशी मागणी होवू लागली आहे.

ग्रामिण भागात दळणवळणाचे प्रमुख साधन म्हणून बससेवेकडे (bus service) पाहिले जात आहे. मात्र करोना प्रादूर्भावामुळे ही सेवा बंद करण्यात आली होती. आता करोना प्रादूर्भाव कमी झाला असला तरी देखील राज्य शासनात विलिनिकरण (Merger) करावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून बस कर्मचारी संपावर गेले आहे. साहजिकच ग्रामिण भागाची (rural area) बससेवा कोलमडून पडली आहे. मागील महिन्यापासून अनेक कामगार संघटनांनी (workers association) संपातून माघार घेतली असली तरी देखील पाहिजे त्या प्रमाणात कर्मचारी कामावर हजर न झाल्यामुळे बसची चाके अद्यापही रूतलेलीच आहेत.

परिणामी पुरेशा कर्मचार्‍यांअभावी अनेक बसगाड्या आगारात उभ्या आहेत. करोना (corona) प्रादूर्भावापासून खासगी बस सेवा (Private bus service) देखील बंद झाली असून या व्यवसायिकांनी अन्य उद्योगधंद्यांकडे आपला मोर्चा वळविल्याने खासगी प्रवाशी वाहने फारशी रस्त्यावर धावतांना दिसत नाही.

अद्यापही तालुक्यातील सारोळेथडी ते पिंपळगाव (pimpalgaon), लासलगाव (lasalgaon) ते खेडलेझुंगे (Khedlezhunge), चांदवड (chandwad) ते सिन्नर (sinnar), पिंपळगाव ते लासलगाव, लासलगाव ते पुणे, लासलगाव ते कोळगाव, नाशिक (nashik) ते ओझर (ozar) मार्गे निफाड (niphad), करंजीखुर्द ते सिन्नर, पिंपळगाव, दावचवाडी, नांदुर्डी, उगाव मार्गे लासलगाव तसेच लासलगाव, निफाड, कुंदेवाडी, रानवड मार्गे कानमंडाळे आदींसह अनेक बसफेर्‍या अद्यापही बंद आहेत.

परिणामी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, चाकरमानी, व्यवसायिक व प्रवाशांना नानाविध संकटांचा सामना करावा लागत आहे. गरीब जनतेच्या प्रवासाची साधन असलेली लालपरी रस्त्यावर धावणे गरजेचे आहे. सध्या शाळा, महाविद्यालय यांचा परिक्षा कालावधी सुरू असून विद्यार्थ्यांना नानाविध संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनीही एक पाऊल मागे घेवून संप मिटविण्यासाठी प्रयत्न करुन गरीब जनतेला बससेवेचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.