
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
केवायसी अपडेट (KYC Update) करण्याच्या बहाण्याने शहरातील एका डॉक्टरांना पाठवलेल्या मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्याने त्यांच्या खात्यातून ३ लाख ९९ हजार ९८४ रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांच्या सुनेच्या तक्रारीनुसार सायबर पोलिस ठाण्यात (Cyber Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. सृष्टी विक्रांत विजन (Dr. Srushti Vikrant Vijan) (रा. कॉलेजरोड) यांनी सायबर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे सासरे डॉ. विनोद विजन (Dr. Vinod Vijan) यांना बँक खात्याचे केवायसी अपडेट करण्याचा मेसेज आला.
त्यांनी त्यावर क्लिक केल्यानंतर बँक खात्यावरून चार व्यवहारांद्वारे ३ लाख ९९ हजार ९८४ रुपये इतर खात्यात वर्ग झाले. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.