गाव तस चांगल, मात्र अतिक्रमणाने वेढलं

गाव तस चांगल, मात्र अतिक्रमणाने वेढलं

सातपूर। प्रतिनिधी Satpur

सातपूर ( Satpur ) परिसर हा कष्टकरी कामगार वसाहतीचा परिसर असल्याने याठिकाणी कोणीही यावे अन दुकान थाटावे असा प्रकार सध्या सुरू आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर रोजगार बुडाल्याची ओरड करीत अनेक लोकांनी आणखी एक उत्पन्नाचे साधन म्हणून दुकान थाटण्यास सुरूवात केल्याचे चित्र आहे.

परिसरात श्री छत्रपती शिवाजी मंडई ही बाजार पेठ असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा होता.बाजारपेठ बंदमुळे अतिक्रमण हटले असले तरी पुन्हा स्थापित होण्यास सुरूवात झाली असल्याचे चित्र आहे.

सातपूर कॉलनीच्या कोपर्‍यावर श्रीराम चौकात फळ विक्रेत्यांची बाजारपेठ भरु लागलेली आहे. 10 ते 15 फळविक्रेत्यांच्या गाड्या याठिकाणी ठाण मांडून बसलेल्या आहेत.

सातपूर -अंबड लिंक रोडवर व्यवसायीकांनी दुकानापुढे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करुन भंगार माल विक्रीला ठेवलेला आहे. याच मार्गावर खुल्या जागेत मोठ्या प्रमाणात मांसविक्री केली जात आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची भिती आहे.

सातपूर कॉलनी परिसरातील अशोकनगर भागात मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते व फळ विक्रेत्यांचे हातगाडे लागत आहेत. श्रमिकनगर व शिवाजी नगर भागात कमी अधिक प्रमाणात हेच चित्र आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com