आरटीओ कर्मचारी रस्त्यावर उतरणार

मोटर वाहन विभागाच्या खाजगीकरणाच्या विरोधात
आरटीओ कर्मचारी रस्त्यावर उतरणार
देशदूत न्यूज अपडेट

पंचवटी | Panchavti

नवीन मोटार वाहन कायद्याच्या (New Motor Vehicle Act) अनुषंगाने नव्या गाडयांची नोंदणी वितरकांमार्फत (Registration of vehicles) करण्याची प्रक्रिया सुरु करुन केंद्र सरकारने मोटार वाहन विभागाच्या (Motar Vehicle Department) खाजगीकरणाचा (In Private) घाट घातला आहे.

जनहिताच्या कामांसाठी कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्यास संघटनेचा विरोध नाही, परंतु सुधारणांच्या नावाखाली सुरु असलेल्या खाजगीकरणाला आमचा मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेचा विरोध (Employee union opposition) असल्याने मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने त्याविरुध्द आंदोलन (Agitation) पुकारले आहे.

आज बुधवार ( दि. ७ जुलै २०२१ ) रोजी नाशिक आरटीओ कार्यालयातील (Nashik RTO Office) कर्मचारी काळ्याफिती लावून निदर्शने (Demonstrations with black ribbons) करणार असल्याची माहिती मोटर वाहन कर्मचारी संघटनेचे नाशिक विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर करंजकर (President Dnyaneshwar Karanjkar) यांनी दिली.

दरम्यान आजच्या आंदोलनानंतर आंदोलनाचे पुढील टप्पे जाहीर केले जाणार आहेत असेही करंजकर यांनी सांगितले .

केंद्र सरकारने (Central Government) संसदेत मोटार वाहन विषयक कायदयास(Motar Vehicle Act) मंजूर करून घेतल्यापासून या विभागातील सेवांचे खाजगीकरण करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Central Minister Nitin Gadkari) यांनी जाहीर केले आहे.

त्यानुसारच नवीन गाड्यांच्या नोंदणीचे काम वितरकामार्फत केले जाणार आहे. हे काम मोटार वाहन विभागाचे असून त्याचे खाजगीकरण करण्यास संघटनेचा पूर्णपणे विरोध आहे. सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणास राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे नेते र. ग. कर्णिक यांनी सन १९९० पासून विरोध केला होता. तीच भूमिका संघटनेची कायम आहे.

त्यामुळे केंद्र सरकारच्या या खाजगीकरणाच्या धोरणास विरोध करण्यासाठी राज्यातील सर्व आर.टी.ओ. कर्मचारी बुधवारी सकाळी काळ्याफिती लावून आपआपल्या कार्यालयात निदर्शने करणार आहेत . सुधारणांच्या नावाखाली खाजगीकरण व कंत्राटीकरण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्याला कडाडून विरोध केला जाईल. त्यासाठी हे पहिले आंदोलन करुन सरकारला इशारा

देण्यात येत आहे.

या आंदोलनाची दखल राज्य सरकारनेही घेऊन संभाव्य खाजगीकरण थांबवावे, कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊनच जनताभिमुख धोरण राबवावे, अशी मागणी करण्यात

आली आहे.

तसेच या आंदोलनाची दखल न घेतल्यास तर संघर्ष तीव्र करण्यात करण्याचा इशारा देखील देण्यात आला असून आजच्या आंदोलनानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर करंजकर, पदाधिकारी अनुप वाघ, संतोष नाईक, किरण कापसे, हर्षल माळी, पंढरीनाथ आडके, भरत चौधरी, संतोष पाटील यांनी सांगितले आहे .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com