'या' कारणामुळे नाशिक आरटीओच्या उत्पन्नात घट

यंदाची टक्केवारी 'इतकी'
आरटीओ
आरटीओ

नाशिक | Nashik

नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मागील वर्षी जुलै अखेरीस ९४ कोटी रूपयांचा महसूल जमा केला होता.

यावर्षी करोनामुळे जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत केवळ ३० कोटींचाच महसूल मिळाला आहे. गत वर्षीच्या तुलनेत महसुलात ६५ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.मोठ्या प्रमाणात महसूल देणारा विभाग म्हणून प्रादेशिक परिवहन विभाग मानला जातो. करोनामुळे देशात मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. यानंतर जवळपास सर्वच क्षेत्रात आर्थिक स्थिती कोलमडली असून यातून महसूल मिळवून देणारा 'आरटीओ' विभागही सुटू शकला नाही.

पेठरोड वरील नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात विविध प्रकारच्या वाहनांची नोंदणी, नंबर, फिटनेस, तसेच वाहनांसंबंधीत अन्य कागदपत्रांची कामे केली जातात. लॉकडाऊनच्या कालावधीत आरटीओ कार्यालयाचे कामकाज मंदावले असून जून महिन्यात येथील कामकाज पूर्ववत सुरू झाले आहे.

मात्र तरीही गत महिन्यात जुलै अखेरीस ५ हजार २३१ दुचाकी, १ हजार ४०६ चारचाकी व इतर १ हजार ४३२ अशी एकूण ८ हजार ६९ वाहनांची नोंदणी करण्यात आली. यातून प्रादेशिक परिवहन कार्यालयास अवघा ३० कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. म्हणजेच गत वर्षीच्या तुलनेत जवळपास ६५ टक्क्यांहून अधिक महसुली उत्पन्नात घट झाली आहे, असे नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले अाहे.

मागील वर्षी जुलै महिन्याच्या अखेरीस २१ हजार १०५ दुचाकी वाहने, ४ हजार १९९ चारचाकी वाहने व इतर ४ हजार ३८ अशी एकूण २९ हजार ३४२ वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. यातून सुमारे ९४ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता.

करोनामुळे आरटीआेच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात आहे. यंदा ६५ टक्क्यांहून अधिक महसूली तूट निर्माण झाली आहे. - विनय अहिरे (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com