आजपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू

अशी आहे प्रवेश प्रक्रिया
आजपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक | Nashik

करोनाचा पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. सन २०२१-२२ साठी २५ टक्के विद्यार्थी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून ३० जून या कालावधीत होणार आहे.

आरटीईअंतर्गत दि. ७ एप्रिल रोजी सोडत काढण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठीची लॉटरी लागलेली आहे, अशा विद्यार्थ्यांची निवड यादी आणि पुढील फेरीसाठी प्रतीक्षा यादी आरटीई पोर्टलवरील होमपेजवर अपलोड करण्यात आली आहे.

।दि. ३० जूनपर्यंत पालकांनी शाळांमध्ये प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना पुढील फेऱ्यांमध्ये पुन्हा संधी दिली जाणार नाही. पालकांनी पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, अशी सूचना प्राथमिक शिक्षण संचालक जगताप यांनी परीपत्रकाद्वारे दिली आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील ३४५ शाळांमध्ये आरटीईअंतर्गत ३,१८१ जागा रिक्त आहेत. त्यासाठी २,६४५ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत.

अशी आहे प्रवेश प्रक्रिया

निवड यादीत नाव आलेल्या पालकांना आरटीई पोर्टलवर तारीख देण्यात येईल. त्यानंतर पालकांनी मूळ कागदपत्रे घेऊन त्या शाळेत तात्पुरता प्रवेश निश्चित करावा.

कोरोनाचा पार्श्वभूमीवर प्रत्यक्षरीत्या शाळेत येऊ न शकणाऱ्या पालकांनी दिलेल्या मुदतीत दूरध्वनी, व्हाट्सअप्प द्वारे त्या शाळेशी संपर्क साधून प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षण संचालनालय यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com