आकर्षक वाहन क्रमांकातून आरटीओला दोन कोटी ४१ लाख रूपये

आकर्षक वाहन क्रमांकातून आरटीओला दोन कोटी ४१ लाख रूपये

नाशिक |Nashik (प्रतिनिधी)

आकर्षक नोंदणी क्रमांकाच्या माध्यमातून नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाला काेट्यवधी रूपयांचा महसूल मिळाला आहे.

या वर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे वाहन विक्रीत काही प्रमाणात घट झाली असली तरी आकर्षण नोंदणी क्रमांकातून चांगला महसूल मिळाला आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२० दरम्यान जवळपास दोन कोटी ४१ लाख ५१ हजारांचा महसूल नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाला मिळाला आहे.

एप्रिलमध्ये ८४ हजार, मेमध्ये एक लाख ९५ हजार, जून-१६ लाख १२ हजार, जुलै-११ लाख ९२ हजार, ऑगस्ट-१५ लाख २८ हजार, सप्टेंबर-२९ लाख ७५ हजार, ऑक्टोबर-५३ लाख पाच हजार, नोव्हेंबर-६१ लाख दोन हजार आणि डिसेंबरमध्ये ५१ लाख ५८ हजार महसूल मिळाला आहे.

या वर्षी वाहन विक्रीत चांगली वाढ होत असल्यानेही आकर्षक क्रमांकाच्या माध्यमातून चांगला महसूल प्राप्त होईल, असे आधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com