रिपाइं शहर-तालुका पदाधिकार्‍यांची निवड

रिपाइं शहर-तालुका पदाधिकार्‍यांची निवड

मालेगाव । प्रतिनिधी | malegaon

येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (Republican Party of India) महानगर संपर्क कार्यालयात धम्मचक्र प्रवर्तनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी भगवान गौतम बुद्ध (Lord Gautama Buddha) व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या प्रतिमांचे पूजन ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारत जगताप (Rural District President Bharat Jagtap), तालुकाध्यक्ष दिलीप अहिरे (Taluka President Dilip Ahire) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिपाइंच्या शहर व तालुका नूतन पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येऊन त्यांच्या नावांची घोषणा केली गेली.

रिपाइं (RPI) संपर्क कार्यालयात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले (RIP President Ramdas Athawale) व जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे (District President Prakash Londhe) यांच्या निर्देशानुसार ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारत जगताप यांनी शहर व तालुक्याच्या नूतन पदाधिकार्‍यांची नियुक्ती करत त्यांच्या नावांची घोषणा केली. या कार्यकारिणीत तालुका उपप्रमुख विष्णू शेजवळ,

सरचिटणीस रवींद्र पगारे, सहसचिव सुभाष अहिरे, बाळू बिर्‍हाडे, महिला कार्याध्यक्ष भारती सोनवणे, तालुका युवा अध्यक्ष दिलीप शेजवळ, युवा सरचिटणीस प्रसेनजित चंदन म्हसदे, कार्याध्यक्ष बाळासाहेब पगारे, कामगार युनियन अध्यक्ष सुदेश त्र्यंबक वाघ, तालुका युवा कार्याध्यक्ष किरण पगारे, युवा शहराध्यक्ष सुशील उशिरे, शहर सहसचिव आनंद यशोद, द्याने विभागप्रमुख आनंद खैरनार, संगमेश्वर उपविभागप्रमुख अशोक मोरे आदींचा समावेश करण्यात आला आहे.

ग्रामीण जिल्हा संपर्कप्रमुखपदी दादाजी महाले तर जिल्हा कार्याध्यक्षपदी सुनील यशोद यांची निवड घोषित करण्यात आली. कार्यकारिणी घोषित केल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष जगताप यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच पक्षसंघटन मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातून सक्रिय होण्याचे आवाहन केले. यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप अहिरे, शहराध्यक्ष विकास केदारे, महिला आघाडी अध्यक्ष शीतल खैरनार आदींसह मोठ्या संख्येने रिपाइं पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com