भोंग्यांच्या राजकारणात रिपाइंची उडी

भोंग्यांच्या राजकारणात रिपाइंची उडी

मनमाड। प्रतिनिधी | Manmad

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena chief Raj Thackeray) यांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्याबाबत सुरु केलेल्या वादात आता रिपाइंने (RPI) उडी घेतली असून

एकाही धार्मिक स्थळावरील (religious place) भोंग्याला (loudspeaker) हात लावला तर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Union Minister of State Ramdas Athavale) यांच्या आदेशानुसार त्याचे संरक्षण करण्यास रिपाइं सज्ज असल्याचा इशारा रिपाइंचे जिल्हा संपर्कप्रमुख राजाभाऊ अहिरे (District contact head Rajabhau Ahire) व जिल्हा कार्याध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन (District Working President Gangabhau Tribhuvan) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

पत्रकात म्हटले आहे कि, भारतात सर्व जाती-धर्मांचे नागरिक शेकडो वर्षापासून गुण्यागोविंदाने राहत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षापासून खाण्यापासून कपडे घालण्यापर्यंत बंधने घातली जात आहेत. भारतात (india) लोकशाही (Democracy) असून डॉ. बाबसाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी लिहिलेल्या संविधानाने सर्वाना समान अधिकार दिलेले आहेत. मनसेना प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) व काही हिंदुत्ववादी संघटना, दलित-मुस्लीमांना डिचविण्याचा प्रयत्न करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे देशात व राज्यात अशांततेचे वातावरण निर्माण होत आहे.

आता मशीदींवरील भोंग्याचा (loudspeaker) वाद उकरून काढण्यात आला आहे. भोंगे केवळ मशीदींवरच नाही तर सर्वच धार्मिक स्थळांवर आहेत. शिवाय भोंग्याचा वापर राजकीय पक्ष देखील मोठ्या प्रमाणात करतात. ध्वनीप्रदूषण (Noise pollution) फक्त भोंग्यामुळेच होत नाही तर इतरही अनेक घटक आहेत, ज्यांच्यामुळे ध्वनीप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. केवळ ध्वनीप्रदुषण नाही तर वायूप्रदूषण (Air pollution) देखील घातक आहे. कारखाने व इतर घटकांमुळे वायूप्रदूषण होत आहे. मग कारखाने व इतर घटक देखील बंद करणार आहात का? असा प्रश्न अहिरे व त्रिभुवन यांनी उपस्थित केला आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे कि, भोंग्यांवरुन अजान दिली जाते तसे आरती, भजन, प्रवचन, गुरुवाणी, प्रार्थना देखील म्हटली जाते. त्यामुळे सर्वच जाती-धर्मांच्या प्रार्थना स्थळावर भोंगे आजपासून नाही तर अनेक वर्षापासून आहेत. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशांचे सर्वच पालन करतात. मात्र केवळ एका समाजाला टार्गेट गेले जात आहे. त्यामुळे मशीदींसह सर्व धार्मिक स्थळांवरील भोंग्याचे रक्षण करण्यासाठी आरपीआय सज्ज असल्याचे अहिरे व त्रिभुवन यांनी पत्रकाच्या शेवटी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.