कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना पेन्शन द्या

आरपीआयची मागणी
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना पेन्शन द्या
USER

नाशिक । Nashik

कोरोना महामारीत (Corona Pandemic) मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना पेन्शन देण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन रिपब्लिन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) Republican Party of India (Athawale) गट व भाजपतर्फे (bjp) समाजकल्याण विभागाचे (Department of Social Welfare) प्रादेशिक उपायुक्त (Regional Deputy Commissioner) भगवान वीर (Bhagwan Veer) यांना दिले आहे.

मागील दोन वर्षात राज्य व देशात कोरोना महामारीत अनेकांचे प्राण गेले आहेत. बहुतांश घरांतील कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या कुटुंबांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने (State Government) दरमहा १० हजार रुपयांची पेन्शन (Pension) द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

याप्रसंगी अनिल गांगुर्डे, भाजपचे नामदेव हिरे, राजश्री शिंदे, लीना हिरे व प्रशांत गांगुर्डे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com