भोंग्याच्या समर्थनार्थ रिपाइं कार्यकर्ते रस्त्यावर

भोंग्याच्या समर्थनार्थ रिपाइं कार्यकर्ते रस्त्यावर

मनमाड । प्रतिनिधी | Manmad

मनसेना अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) हे हुकूमशाही करत असल्याचा आरोप करत शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (Republican Party of India) पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी भोंग्याच्या वादात आज उडी घेतली. भोंग्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढत नगीना मशिदीजवळ रिपाइं कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करत मशिदीचे रक्षण केले.

यावेळी राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणा देत संतप्त रिपाइं कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. ठाकरे भोंग्याच्या मुद्यावर देशासह राज्यात अशांतता निर्माण करत असल्याने त्यांच्याविरूध्द देशद्रोहाचा गुन्हा (Crime of treason) दाखल करावा, अशी मागणी यावेळी पोलीस अधिकार्‍यांना निवेदन (memorandum) देत करण्यात आली. मशिदींवरील अनधिकृत असलेले भोंगे (loudspeaker) उतरविण्यात यावे यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकराला (state government) 4 मेचा अल्टीमेटम दिला होता त्याच्या निषेधार्थ आरपीआयतर्फे जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र आहिरे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन, युवा तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांच्या नेतृत्वाखाली आरपीआय भवनापासून मोर्चा काढण्यात आला.

हा मोर्चा शहरातील विविध मार्गावरून जावून नगीना मशिदजवळ आल्यानंतर नही चलेंगी नही चलेंगी राज ठाकरे कि दादागिरी नही चलेंगी, देश चलताही संविधान से, मशिदीवरील भोंग्याच्या संरक्षणासाठी आरपीआय मैदान मे आदी घोषणा देत मानवी साखळी करत मशिदीचे संरक्षण करण्यात आले. यावेळी मंडल व पोलीस अधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात राज्य आणि देश हा संविधानाने चालतो कोणाच्याही अल्टीमेटमवर नाही. राज ठाकरे भावनिक मुद्दे उपस्थित करून दोन समाजात तेढ निर्माण करीत आहे.

भोंगे केवळ मशिदीवरच (mosque) नाही तर मंदिरसह इतर धार्मिक स्थळांवर देखील आहे. मात्र राज ठाकरे केवळ मुस्लीम समाजाला टार्गेट करत आहे आरपीआय हे कदापि सहन करणार नाही. ठाकरे हे संविधान आणि सुप्रीम कोर्टाच्या विरोधात भूमिका घेऊन हुकुमशाही करत आहे त्यांची कृती राज्यात आणि देशात अशांतता माजविणारी असल्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी कैलास आहिरे, दिनकर धीवर, अनिल निरभवणे, पी.आर. निळे, रुपेश आहिरे, अ‍ॅड. प्रमोद आहिरे, महेंद्र वाघ, दिनकर कांबळे, शेखर आहिरे, प्रशांत दराडे, नाना अहिरे, अकिल शेख, कमलताई खरात, अरुणा जाधव, कृष्णा पगारे, सुधीर शाहू आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com