छत्रपतींचा अवमान कराल तर कर्नाटकात येवून मस्ती जिरवू 

छावा क्रांतीवीर सेनेकडून कर्नाटक सरकारला इशारा
छत्रपतींचा अवमान कराल तर कर्नाटकात येवून मस्ती जिरवू 
छत्रपतींचा अवमान कराल तर कर्नाटकात येवून मस्ती जिरवू

सातपूर l Satpur (प्रतिनिधी)

कन्नड रक्षक गुंडाकडून महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा पुतळा एका रात्रीत काढला गेला. हा पुतळा पुन्हा सन्मानाने आहे त्या जागी विराजमान करा, अन्यथा कर्नाटकात येवून मस्ती जिरवू, असा सज्जड इशारा छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हटविला. या घटनेचा छावा क्रांतिवीर सेनेच्यावतीने निषेध करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता आहे आमच्या अस्मितेवर जर कोणी घाला घालत असेल तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे

आजही कर्नाटक प्रशासनाने पूतऴा तातडीने बसवला नाहीतर महाराष्ट्रात एकाही कानडी माणसाला राहू देणार नाही असाही इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com