विंचूरला पोलिसांचे सशस्त्र संचलन

विंचूरला पोलिसांचे सशस्त्र संचलन

विंचूर । प्रतिनिधी Vinchur

विंचूर ( Vinchur ) येथे आगामी गणेश उत्सव ( Ganesh Festival ) व पोळा सणाच्या ( Pola Festival )पार्श्वभूमीवर निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांचे उपस्थित विंचूर शहरातून तसेच तीन पाटीभागात रूट मार्च (Route march of Police) काढण्यात आला.

यावेळी दंगा नियंत्रण पथकाकडील (riot control squad )20 अंमलदार, लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल वाघ, पोलीस उपनिरीक्षक अजीनाथ कोठळे, 13 अंमलदार, निफाड पोलीस स्टेशनचे एक अधिकारी, 6 अंमलदार तसेच सायखेडा पोलीस ठाण्याचे एक अधिकारी, 6 अंमलदार आदींसह पोलीस कर्मचारी या संचलनात सहभागी झाले होते. यावेळी स.पो.नि. राहूल वाघ यांनी पोलीस कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com