शांततेसाठी सशस्त्र पोलिसांचे संचलन

जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये : अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी
शांततेसाठी सशस्त्र पोलिसांचे संचलन

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शांतता अबाधित राहावी यास्तव शहरात पर्याप्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी तसेच समाजकंटकांवर वचक राहावा या दृष्टीकोनातून आज शुक्रवारच्या पार्श्वभूमीवर काल सशस्त्र पोलिसांतर्फे By the armed police सायंकाळी संवेदनशील भागात संचलन route march करण्यात येवून शक्ती प्रदर्शन केले गेले.

गत शुक्रवारी शहरात त्रिपुरातील Tripura कथित अत्याचार घटनांच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान दंगल होवून दगडफेक, तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. पोलिसांवर मोठ्या प्रमाणात झालेल्या दगडफेकीमुळे तीन अधिकार्‍यांसह सात कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले होते.

दंगलखोरांनी rioters नवीन बसस्थानक व परिसरात व्यापारी प्रतिष्ठानांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करत नासधूस केली होती. एका दवाखान्यास आग लावण्याचा प्रकार देखील घडला होता. तीन ते चार तास धुडगुस घालणार्‍या या दंगलखोरांवर अश्रुधूराच्या नळकांड्या फोडत तसेच मिरची सेलचा वापर करीत नियंत्रण प्रस्थापित करण्यात पोलिसांना रात्री यश आले होते. या दंगल व हिंसाचारप्रकरणी शहर, आयेशानगर, किल्ला व आझादनगर पोलीस ठाण्यात वेगवेगळे 9 गुन्हे दाखल करण्यात येवून 54 जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी सुरू केलेल्या या अटकसत्राच्या कारवाईमुळे दंगलखोरांचे धाबे दणाणले आहे. बंदचे आवाहन करणार्‍या रजा अ‍ॅकेडमी या संघटनेच्या कार्यालयावर पोलिसांनी छापा मारून झडती घेत कागदपत्रे जप्त केली आहेत. संघटनेच्या पदाधिकार्‍यांवर देखील बंद प्रकरणी गुन्हे दाखल केले गेल्याने मुस्लीम संघटनांतर्फे नाराजी व्यक्त केली गेली. आ. मौलाना मुफ्ती यांनी या कारवाईबाबत थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

दरम्यान, समाजकंटकांतर्फे अफवा पसरविण्याचा उद्योग सुरूच असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. आज शुक्रवार असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राहावी या दृष्टीकोनातून आज सायंकाळी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र पोलिसांचे संचलन शहरातील संवदनशील भागातून काढण्यात आले. पोलीस नियंत्रण कक्षातून या संचलनास प्रारंभ झाला होता.

शहरात शांतता

संपुर्ण शहरात शांतता असून जनजीवन सुरळीतरित्या सुरू आहे. सशस्त्र पोलिसांचा पर्याप्त बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आलेला आहे. त्यामुळे जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच अफवा पसरविणार्‍यांची महिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे.

अटक संशयितांची संख्या 54

शुक्रवारी घडलेल्या दंगल प्रकरणी पोलिसांनी आज दोघांना अटक केल्याने या हिंसाचार प्रकरणी अटक केलेल्यांची संख्या 54 वर पोहचली आहे. दरम्यान, दंगल प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या काँग्रेस प्रवक्ते साबीर गौहर यांच्यासह 22 संशयितांना 1 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. येथील कारागृहात जागा नसल्याने संबंधितांची रवानगी नाशिक येथील कारागृहात करण्यात आली आहे. तर 30 जणांना 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांतर्फे दाखल वेगवेगळ्या 9 गुन्ह्यांमध्ये अटकसत्र सुरूच आहे. पुरावा तपासूनच सदर कारवाई होत असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील व अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com