
मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
शहरवासियांच्या सेवेत सन 1980 पासून कार्यरत असलेल्या बी.एस. भंडारी रोटरी आय हॉस्पीटलतर्फे (B.S. Bhandari Rotary Eye Hospital) अत्याधुनिक रूग्णवाहिकेद्वारे (Sophisticated ambulances) फिरते नेत्ररूग्णालय (Mobile eye hospital) सुरू करण्यात आले असून दुर्गम भागातील जनतेसाठी थेट रूग्णांच्या दारी जावून तपासणीची सुविधा उपलब्ध केली असल्याची माहिती रोटरी क्लबचे (Rotary Club) अध्यक्ष अॅड. विजय कुलकर्णी (Adv. Vijay Kulkarni) यांनी दिली.
रोटरी आय हॉस्पीटल सभागृहात पत्रकारांशी वार्तालाप करतांना अॅड. कुलकर्णी पुढे म्हणाले, मालेगावच्या (malegaon) रोटरी आय हॉस्पीटलमध्ये शहरासह जिल्हाभरातील रूग्ण उपचारासाठी येतात. आतापर्यंत दोन लाखाहून अधिक शस्त्रक्रिया (Surgery) करत रूग्णालयाने रूग्णांना दृष्टी मिळवून दिली आहे. येथे दरमहा सुमारे 500 शस्त्रक्रिया केल्या जातात. संस्थेला आयएसओ 9001 : 2015 मानांकन प्राप्त झालेले आहे.
रूग्णालयातर्फे एम.बी.बी.एस. (MBBS) पदवीनंतर सी.पी.एस. (C.P.S.), डी.ओ.एम.एस. (D.O.M.S.) अभ्यासक्रम सुरू केला असून नेत्रतज्ज्ञ होण्यासाठी डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री (Diploma in Optometry) हा अभ्यासक्रमही सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाद्वारे ग्रामीण भागातील जनतेला कुशल नेत्रतंत्रज्ञ उपलब्ध होणार आहेत. हे अभ्यासक्रम शिकवितांना परिपूर्ण तसेच शास्त्रोक्त शिक्षण दिले जाणार असल्याने विद्यार्थ्यांना रोजगार देखील उपलब्ध होणार असल्याचे प्रकल्प संयोजक डॉ. दिलीप भावसार (Project Coordinator Dr. Dilip Bhavsar) यांनी सांगितले.
ग्रामीग भागातील जनतेला चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी रोटरी फाऊंडेशन (Rotary Foundation) व काठमांडू (नेपाळ) (Kathmandu) रोटरी क्लबच्या सहकार्याने डोळ्यांचे एक फिरते रूग्णालय मिळवून दिले आहे. फोर्स कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलर वाहनात नेत्र तपासणीच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती हॉस्पीटलचे अध्यक्ष अजय शाह यांनी यावेळी दिली.
मालगाव रोटरी आय हॉस्पीटलमध्ये (Malgaon Rotary Eye Hospital) अनेक प्रकारची अद्यावत यंत्रसामुग्री उपलब्ध आहे. त्यामुळे हॉस्पीटलमध्ये विविध नेत्र तपासण्या होतात. डोळ्यांचा तिरळेपणा, रेटीना (Retina), मोतीबिंदू (Cataracts), काचबिंदूसह (Glaucoma) विविध व्याधींवर उपचार व शस्त्रक्रियाही केल्या जात असून सर्वसामान्य जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहनही अॅड. कुलकर्णी यांनी केले.
यावेळी राजेंद्र छाजेड, चंद्रकांत शिरापुरे, हरसुखलाल नाकराणी, शिवनारायण काकाणी, दिनेश जाधव, डॉ. विनोद गोरवाडकर, राजेश गगराणी, राकेश डिडवानिया, डॉ. संजय बेंडाळे, व्यवस्थापक स्वप्निल भावसार, डॉ. अलपिया अन्सारी, डॉ. विक्रमसिंग, डॉ. दिप्तीसिंग आदी उपस्थित होते.