Rotary Club of Sinnar
Rotary Club of Sinnar|covid care centre
नाशिक

सिन्नर : ‘रोटरी’कडून उपजिल्हा रुग्णालयास मास्क

क्रांतिदिनाचे औचित्य साधत केली मदत

Vilas Patil

Vilas Patil

सिन्नर । प्रतिनिधी

सिन्नर तालुक्यातील करोना बाधीतांची वाढती संख्या पाहता उप जिल्हा रुग्णालयाला अनेक बाबींची कमतरता भासते आहे. त्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ सिन्नरने रुग्णालयास मास्क, हॅण्ड ग्लोव्हजसह अनेक साहित्य आज (दि.9) क्रांती दिनाचे निमित्त साधत भेट दिले.

रोटरीच्यावतीने 1 हजार मास्क, 1 हजार डिस्पोजेबल कॅप, 1 हजार हॅण्ड ग्लोव्हज, 15 लिटर हॅण्ड सॅनिटायजर उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ. निर्मला गायकवाड यांच्याकडे रोटरीचे अध्यक्ष उदय गायकवाड, सचिव निशांत माहेश्वरी यांनी सुपूर्द केले.

उपजिल्हा रुग्णालयात सुरु असलेले कोवीड केअर सेंटर सध्या रुग्णांमूळे हाऊसफूल असते. रुग्णांच्या वाढत्या संख्येचा विचार करता रुग्णांच्या जीवाची काळजी घेणाऱ्या आरोग्य सेवकांची काळजी घेण्याची जबाबदारी समाजाची आहे. या भावनेतून रोटरीने रुग्णालयास मदत करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

या पूढील काळातही रुग्णालयास गरज भासेल तेव्हा रोटरी क्लब मदतीसाठी पूढे असेल असा शब्द माहेश्वरी यांनी दिला. रोटरीने आज दिलेल्या साहित्याचे प्रायोजकत्व क्लबचे सदस्य संजय आनेराव व अनिल सांगळे यांनी स्विकारले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राहूल दराडे यांच्यासह रोटरीचे सदस्य व आरोग्य विभागाचे सेवक उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com