लॉकडाऊनमध्ये 'इतक्या' कुटुंबांना रोजगार, ६७ कोटी रुपयांचे वाटप

लॉकडाऊनमध्ये 'इतक्या' कुटुंबांना रोजगार, ६७ कोटी रुपयांचे वाटप

नाशिक | Nashik

लॉकडाऊन (Nashik Lockdown) असतांनाही रोजगार हमीचे (Rojgar Hami Scheme) काम थांबले नसून जवळपास ७८ हजार ९२८ कुटुंबाला प्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. तर या माध्यमातून ६७ कोटी ३९ लाख रुपये या मजुरांना मिळाले आहे..

रोजगार हमी योजना आता केंद्र शासनाच्या निधीतुन (Central Government Fund) राबविली जात आहे. त्यानुसार शंभर दिवस कामाची हमी दिली जाते. काम मागीतले आणि मिळाले नाही तर संंबंंधीत अधिकार्‍याला दंंड (Fine For Officer) करुन व्याजासह मजुरी देण्याची तरतुद या कायद्यात आहे. मात्र जागृती नसल्याने अद्याप तरी कोणत्याही मजुराने अधिकार्‍याला अडचणीत आणलेले नाही.

जिल्ह्यात चार लाख ७५ हजार ५५९ जणांची जॉब कार्डधारक (Jobcard) म्हणुन नोंद झाली आहे. त्यात ७८ हजार ९२८ कुटुंंबाचा समावेश आहे. त्यातील ३०३१ कुटुंबीयांना शंंभर दिवस रोजगार मिळाला, सर्वाधीक कामे पेठ तालुक्यात (Peth Taluka) झाली. देवळा तालुक्यात (Deola Taluka) सर्वात कमी करण्यात आली. एकुण १६ हजार ५६० कामे वर्ष भरात झाली. मात्र यात सार्वजनिक कामा पेक्षा वैयक्तीक लाभाच्या कामाचेचे प्रमाण जास्त होते. १४ हजार ४२४ कामे वैयक्तीक लाभाचीच झाली. त्यामुळे आता रोजगार हमीतुन वैयक्तीक लाभाची कामे म्हणजे शेततळे उभारणे, घऱे बांधणे, शौचालय उभारणे, सिंचन विहीर यासारखी कामे होऊ लागली आहे.

पुर्वी जसे रस्ते करणे, खोदणे, रोपवाटीका उभारणेे, खड्डे खोेदणे अशी कामे व्हायची ती आता कमी होऊन वैयक्तीक लाभाकडे रोजगार हमी योजेनेची वाटचाल होऊ लागल्याचे स्पष्ट झाले आहे. वैयक्तीक लाभ असल्याने कामाची गती वाढत आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी केंद्राचा निधी येत आहे.

रोजगार हमी योजनेसाठी प्रत्येक कामगार आपल्या पगारातुन दोन अडीचशे रुपये दरमहा प्रोफेशनल टॅक्स म्हणुन देंतो. तो कर राज्याच्या तिजोरीत जातो. महाराष्ट्रानेच सर्व प्रथम ही योजना राबविली. नंंतर केंंद्र शासनाने तिचे अनुकरण केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com