चाकूचा धाक दाखवून लुटमार

चाकूचा धाक दाखवून लुटमार

सातपूर । प्रतिनिधी

चाकूचा धाक दाखवून showing fear of knives युवकाला लुटल्याचा Robbery प्रकार सातपूर औद्योगिक वसाहतीतील Satpur Industrial Area स्नायडर कंपनीजवळ रात्री साडेअकराच्या दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर येथील कल्पेश सोपान खैरनार हा युवक रविवार रात्री 11.30 च्या दरम्यान सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीत रात्री सेकंड शिफ्ट संपवून पायी शिवाजीनगरला घरी जात होता.

त्यावेळी स्नायडर कंपनीजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कल्पेश खैरनार यास अडवून चाकूचा धाक दाखवत पैशाची मागणी केली. पैसे नसल्याने त्यांच्या जवळचा मोबाइल हिसकावून घेतला. खैरनार यांनी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारा विरोधात अर्ज दाखल केला आहे. सातपूर पोलीस Satpur police stationअधिक तपास करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com