
नाशिकरोड | प्रतिनिधी
उपनगरसह नाशिकरोड, जेलरोड परिसरामध्ये चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून चोरटे घरातील सामानांवर हात साफ करताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसात उपनगर परिसरात घरफोड्या, भुरट्याचोऱ्या अशा घटनांमध्ये वाढ झाली असून अशीच घटना उपनगरमध्ये घडली आहे...
बंद घराच्या दरवाजाचे कडी कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला व कपाटातील ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात साधना आढाव राहणार नारायण बापू नगर जेलरोड नाशिक रोड यांनी तक्रार दाखल केली असून तक्रारीत म्हटले आहे की काही कामानिमित्त आम्ही बाहेर गेलो असता घराचा दरवाजा बंद करून गेलो होतो या संधीचा फायदा घेऊन आज्ञा चोरट्याने घरात प्रवेश केला व कपाटातील ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले असेही तक्रारीत म्हटले आहे.