उपनगरला घरफोडी; 'इतक्या' लाखांचा ऐवज लंपास

उपनगरला घरफोडी; 'इतक्या' लाखांचा ऐवज लंपास

नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashikroad

नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune) असलेल्या शिवाजीनगर (Shivajinagar) येथील जनता हायस्कूल जवळ सहकार कॉलनीतील एका बंद बंगल्याच्या दरवाजाचे कडी कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. कपाटात असलेले चार सोन्याच्या अंगठ्या व अडीच लाख रुपये रोख असा सुमारे तीन लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

यासंदर्भात अरुण राघू अहिरे (रा. सहकार कॉलनी, जनता हायस्कूल जवळ, शिवाजीनगर, नाशिक-पुणे रोड) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

त्यात म्हटले आहे की, आपल्या बंद बंगल्याच्या दरवाजाची कडी कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला व बंगल्याच्या हॉलमध्ये असलेल्या कपाटातील अडीच लाख रुपये रोख व एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या चार अंगठ्या असा सुमारे तीन लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

या तक्रारीनुसार उपनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील हे करत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com