आई-मुलास बांधून ठेवत जबरी दरोडा; मारहाण करीत लुटला लाखोंचा ऐवज

आई-मुलास बांधून ठेवत जबरी दरोडा; मारहाण करीत लुटला लाखोंचा ऐवज

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे गुरुवारी (दि.24) सायंकाळी 7.30 च्या सुमारास 8 जणांच्या टोळक्याने एका घरात शिरुन आई व मुलास मारहाण करीत बांधून ठेवत महिलेच्या अंगावरील दागिन्यांसह कपाटातील दागिने व रोकड घेऊन पोबारा केल्याची घटना घडली. यामुळे काल सायंकाळपासूनच परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे...

वडगाव पिंगळा येथील भवानी मंदिराजवळ ज्ञानेश्वर कोंडाजी हुल्लुळे यांचे घर आहे. हुल्लुळे हे गुरुवारी टोमॅटो विक्रीसाठी मार्केटला गेले होते. यावेळी त्यांची पत्नी मुक्ताबाई (50) व मुलगा राहुल (32) हे घरात होते. सायंकाळी दोघे आपल्या घरातील हॉलमध्ये टीव्ही बघत असताना पुढील बाजूच्या दरवाजाने अचानक 8 जणांच्या टोळक्याने घरात प्रवेश केला.

काही कळण्याच्या आत टोळक्याने हातात असलेल्या दोरीने मुक्ताबाई व राहुल यांना बांधून ठेवले. दोघांच्या तोंडाला चिकटपट्टी लावून लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

मुक्ताबाई याच्या गळ्यातील व कानातील दागिने ओरबाडून घेतल्याने त्या जखमी झाल्या. त्यानंतर चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले 6 तोळ्यांचे सोन्याचे दागिने व 20 हजारांची रोख रक्कम घेत दाराला बाहेरुन कडी लावून पोबारा केला.

त्यानंतर घाबरलेल्या राहुलने सरपटत येत फरशीवर पडलेल्या मोबाईलवरुन आपला मित्र राहूल विंचू याला फोन करत घटनेची माहिती दिली. यानंतर गावकऱ्यांनी वस्तीकडे धाव घेत राहूल व मुक्ताबाई यांची सुटका केली.

आई-मुलास बांधून ठेवत जबरी दरोडा; मारहाण करीत लुटला लाखोंचा ऐवज
महिलांनी कपडे घातले नाही तरी...; रामदेव बाबांचे वादग्रस्त वक्तव्य

मुक्ताबाई यांच्या कानातील झुबे ओरबाडून घेतल्याने त्या जखमी झाल्या होत्या. त्यांना ग्रामस्थांनी तात्काळ शिंदे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलीस पाटील सागर मुठाळ यांनी घटनेची माहिती सिन्नर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

आई-मुलास बांधून ठेवत जबरी दरोडा; मारहाण करीत लुटला लाखोंचा ऐवज
माझ्या करिअरला काही लोकांपासून धोका; प्रियांकाचा धक्कादायक खुलासा

अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत गिलबिले, सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी, हवालदार विनोद टिळे, गिरीश बागुल, नवनाथ शिरोळे. रघुनाथ पगारे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. घरात सर्व जागे असताना दरोडा पडल्याने परिसरात दहशत पसरली असून गाव व शेतात वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांनी सर्तक राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com