सिन्नरमध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या

सिन्नरमध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या

सिन्नर | Sinner

शहरात वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी (Robbery) करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात सिन्नर पोलिसांना (Sinner Police) यश आले असून एकूण 6 घरफोडींचे गुन्हे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे...

तालुक्यात वाढलेल्या घरफोडीच्या घटना, गन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे व सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलिस निरिक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्यांचा तपास सुरु होता.

अधिकाऱ्यांना गोपनिय माहितीच्य आधारे मागील तीन ते चार महिन्यांत झालेल्या घरफोडया संशयीत आरोपी विनोद राजु पवार (30) रा. एकता नगर, नायगाव रोड, पापडया उर्फ अक्षय भाउसाहेब जाधव (26) रा. लोंढे गल्ली, आदित्य दशरथ माळी (21) रा. डुबेरे, ता. सिन्नर यांनी केल्याची खात्रीशिर माहीती मिळाली होती.

तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे पोलिस उपनिरिक्षक सुदर्शन आवारी, पोलिस नाईक समाधान बोऱ्हाडे, एस. पी. शिंदे, कृष्णा कोकाटे, ए. आर. काकड, के. डी. पवार यांच्या पथकाने सापळा रचुन या संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी शहरातील रेणुका नगर, कानडी मळा, मंगलमुर्ती हाईटस, सरदवाडी रोड, वृंदावन नगर, आटकवडे, तसेच सिन्नर तालु्नयातील सुळेवाडी या ठिकाणी दिवसा घरफोडया चोऱ्या केल्याची कबुली दिली.

सिन्नरमध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या
शिर्डीला जाणाऱ्या सायकलस्वारांना कारची जोरदार धडक; दोन जागीच ठार

या सर्व गुन्हाप्रकरणी सिन्नर व एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे होते. गुन्हाची कबूली दिल्यानंतर तीघांना अटक करण्यात आली असुन त्यांचेकडुन 4 लाख 2 हजार 476 रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत पोलिस अधिक्षक उमाप यांनी याबाबत माहिती देऊन तपास पथकास 10 हजारांचे बक्षीस देवून त्यांचा गौरव केला आहे.

सिन्नरमध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या
नांदूरशिंगोटे सशस्त्र दरोडा प्रकरण : सात संशयितांना बेड्या

चोऱ्यांना बसणार चाप

शहरात गेल्या काही महिन्यांपासून सर्रास घरफोड्यांचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. लागोपाठ व दिवसाही घरफोड्या होत असल्याने चोरट्यांनी एकप्रकारे पोलिसांना त्यांना पकडण्याचे एकप्रकारे आव्हानच दिले होते.

मात्र, सिन्नर पोलिसांनी या सर्व घरफोड्यांचा तपास लावत चोरट्यांना चपराक मारली आहे. यामुळे शहरात वाढत्या गुन्हेराच्या घटनांना देखील चाप बसणार असल्याने पोलिसांचे या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com