क्राईम
क्राईम
नाशिक

मुंबई नाका : दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

पोलीसांची कारवाई

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

दरोडा टाकण्याच्या तयारी असलेल्या टोळीस मुंबई नाका पोलिसांनी सोमवारी (दि. १३) रात्री दहा वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कायता, मिरची पुड, नॉयलॉन दोरी असे साहित्य जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास भारतनगर परिसरातील दर्गाजवळील मोकळ्या प्लॉटमध्ये एक टोळके दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र आले होते. यावेळी पोलिसांनी कारवाई करत यातील पाच जणांना ताब्यात घेतले तर दोघे फरार आहे.

समीर मुन्ना शहा (वय २३, रा. भारत नगर, मराठी शाळेमागे), वसिम अब्दुल शेख (वय २३, रा. नंदीनी नगर, वैष्णवी गिरणी जवळ) दीपक पितांबर गायकवाड (वय ३७, रा. विनय नगर, देवी मंदिरामागे), फकीरा रमेश बडे (वय ३१, रा. म्हाडा बिल्डिंग नं.२), किरण खंबाईत उर्फ हुक्का (पत्ता माहित नाही) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

त्यांना मंगळवारी (दि. १४) न्यायालयात हजर केले अस ता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर रवी भांगरे उर्फ बाळी (पुर्ण नाव पत्ता माहित नाही), राहूल (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांचा तपास सुरू आहे. संशयितांकडून कोयता, मिरची पुड, नायलॉन दोरी जप्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात शस्त्र व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, पडीपारी आदेशाचे उल्लघंन व इतर अधिनियमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी सहायक पोलीस निरिक्षक रौंदळे तपास करत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com