यशवंत मंडईतील युको बँकेत सिनेस्टाईल दरोडा
नाशिक

यशवंत मंडईतील युको बँकेत सिनेस्टाईल दरोडा

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | Nashik

यशवंत मंडईतील नॅशनल युको बॅंकेत सिनेस्टाइल दरोडा पडल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

दरोडेखोरांनी दोन दिवसांची सुट्टी साधन भिंतीला भगदाड पाडल्याची घटना घडली. तसेच सीसीटीव्ही फुटेजचीदेखील याठिकाणी तोडफोड केलेली दिसून येत आहे.

घटनास्थळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलीस उपआयुक्त समीर शेख, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून घटनेचा तपास सुरु केला आहे.

या घटनेत चोरट्यांनी किती मुद्देमाल चोरून नेला आहे याबाबतची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

सविस्तर वृत्त लवकरच

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com