सिन्नरच्या मिरगाव शिवारात दरोडा; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

सिन्नरच्या मिरगाव शिवारात दरोडा; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

वावी | वार्ताहर wavi

सिन्नर तालुक्यातील मिरगाव (Mirgaon Tal Sinnar) येथे काल (दि 30) रोजी रात्री दीड ते दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकत तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण असून ग्रामीण पोलिसांनी (Rural Police) रात्रीच्या वेळी गस्त घालावी अशी मागणी केली जात आहे....

मिरगाव शिवारात आपल्या शेतजमिनीत वस्तीवर राहणाऱ्या सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी बाजीराव म्हातारबा वडीतके (वय 78) हे त्यांची मुलगी रत्ना विठ्ठल कोळपे (वय 45) हे दोघे घरी एकटे असतानाच रात्री दीड वाजेच्या सुमारास अचानक सात ते आठ जणांनी घरात प्रवेश केला.

यावेळी तीक्ष्ण हत्याराने दरवाज्याचे कडी कोयंडे तोडत घरात प्रवेश केला. लाकडी दांडक्याच्या सहाय्याने दोघांनाही धक्काबुक्की करत जबर मारहाण केली. यावेळी त्यांच्या जवळील मनी मंगळसूत्र पोत मिनी गंठण अंगठी असा एकूण साडे सहा तोळे सोने व दहा हजार रुपये रोख साडेतीन लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी लंपास करत पोबारा केला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकास पाचारण केले. त्याने पाथरे रोडवर अंदाजे शंभर ते दोनशे मीटर पर्यंत धाव घेतली. मात्र, कुठलाही सुगावा लागला नाही.

दरम्यान, वावी पोलीस ठाण्यात (Wavi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी नाशिक ग्रामीण पोलीस उपाधीक्षक माधुरी कांगणे (Rural Police DSP Madhuri Kangane), निफाड विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे (Niphad SDO Somnath Tambe) यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पुढील तपास वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्यासह पोलिस कर्मचारी एन. बी. जगताप करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com