पेट्रोल
पेट्रोल
नाशिक

नांदुरी येथील साई पेट्रोल पंपावर दरोडा, झटापटीत एकाचा मृत्यू

दरोडेखोरांना पकडण्यात यश

Gokul Pawar

Gokul Pawar

कळवण | kalwan

नांदुरीशिवारातील ओम साई पेट्रोलपंपवर काल (दि १८ जुलै) रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास चार दरोडे खोरांनी सशस्र दरोडा टाकला. यात दोन लाखांचा ऐवज व रोकड घेऊन पलायन केले. मात्र घटना स्थळी आरडाओरड झाल्याने स्थनिक नागरिक व एक मजुरांची वाहतूक करणारी पिकअप वाहनधारकाच्या मदतीने सर्व दरोडे खोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान स्थानिक नागरिकांनी या दरोडेखोरांना चांगलाच चोप दिला. या सर्वाना कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता यातील एक जणांचा मृत्यू झाला आहे. तेजस सूर्यवंशी( रा.निरपूर ता. सटाणा) असे मृताचे नाव आहे.

अधिक माहिती अशी कि, किशोर कौतिक सूर्यवंशी यांचा नांदुरी वणी रोडलगत नांदुरी शिवारात साई पेट्रोलपंप आहे. काल (दि.१८ जुलै) रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास दोन दुचाकीवरून चार अज्ञात इसम तोंडाला रुमाल बांधून पेट्रोलपंपावर आले. यावेळी त्यांनी तोडफोड करीत तीक्ष्ण हत्यारांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. पंप मालकांच्या गळ्यातील चार तोळे सोन्याची चैन, हातातील पाच तोळे वजनाचे ब्रेसलेट, १० हजार किमतीचा व्हिओ कंपनीचा फोन असा एकूण दोन लाखाचा ऐवज ताब्यात घेतला.

याच दरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती मिळतच ते दाखल झाले. तसेच रस्त्यावरील वाहनांनी थांबून या दरोडेखोरांना पकडण्यात मदत केली. यानंतर स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी त्यांना चांगलाच चोप दिला. या सर्वांना उपचारासाठी दाखल करत असताना यातील एकाचा मृत्यू झाला आहे.

याबाबत कळवण पोलीस ठाण्यात भादवी कलम ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जमावाच्या मारहाणीत एका दरोडेखोराचा मृत्यू झाल्याने जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे. अधिक तपास ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंग, उपाधीक्षक शर्मीठी वालावलकर, कळवण पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाघ व सहकारी तपास करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com