सिन्नर : पांगरीत सशस्त्र दरोडा

वृद्ध दांपत्य जखमी
सिन्नर
सिन्नर

पांगरी | Pangri

सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे मंगळवार (दि.२५) रात्री साडे दहा ते साडे अकरा वाजेच्या शिंदे वस्तीवर सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली.

दरम्यान पांगरी खुर्द येथील भास्कर रामराव शिंदे यांच्या वस्तीवर (दि.२५) रात्रीच्या सुमारास अज्ञात सहा तरुणांनी घराचा ताबा दोन्ही पती पत्नीच्या गळ्याला धारदार शस्र लावत दागिन्यांसह मोबाईल जप्त केला. तसेच लाईट बंद करून या दोघांना मारहाण केली.

यावेळी मुलगा शरद याने आरडाओरड करीत शेजाऱ्यांना आवाज दिला. तात्काळ काही शेजारी धावत येत असल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला.

घटनेची माहिती वावी पोलीस स्थानकात कळविण्यात आली. या संदर्भात वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.जाधव, सदगिर, शिंदे अधिक तपास करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com