
पेठ | Peth
तालुक्यातील करंजाळी येथे भरदिवसा घरफोडी झाल्याचा प्रकार घडला आहे. यात २७ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, कृषी सेवा केंद्र असणारे जीवन सुधाकर दळवी यांच्या राहत्या घराचे मागील दरवाजाचे कडी कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी दुपारच्या सुमारास घरात प्रवेश केला.
यानंतर कपाटाचे लॉकर उघडून रोख २५हजार, १ ग्रॅम सोन्याची नथनी ७०० रुपये, पायातील चांदीच्या तोरड्या, ब्रेसलेट २००० रुपये असे एकूण २७ हजार ५०० रुपये रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने केला.
याबाबत पेठ पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पो. नि. दिवानसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जाधव पुढील तपास करीत आहेत.