धाडसी चोरीने देवळालीकर दहशतीखाली

धाडसी चोरीने देवळालीकर दहशतीखाली
file photo file photo

नाशिक रोड | प्रतिनिधी Nashik

बळजबरीने घरात शिरून महिलेला दमदाटी करत घरातील पावणेदोन लाख रुपये तसेच इतर सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सुमारे आठ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. देवळाली गावात हा प्रकार घडल्याने येथील नागरिक चोरट्यांच्या दहशतीखाली आहेत. तीन चोरटे दमदाटी करून घरात शिरल्याचे प्रत्यक्षदर्शी महिलेने पोलिसांना सांगितले.

अधिक माहिती अशी की, देवळाली गाव येथील लिंगायत कॉलनी आदिनाथ सोसायटी येथे राहणाऱ्या भुमिका रवींद्र बाफना या घरात एकट्याच होत्या. यावेळी तीन चोरटे तिथे आले. त्यांनी या महिलेला हल्ला करण्याची धमकी दिली.

त्यानंतर घराच्या दरवाज्याची कडी तोडून त्यांनी घरात प्रवेश केला व कपाटातील पावणेदोन लाख रुपये व दागिन्यांसह सुमारे सात लाख 63 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.

त्यानंतर हे चोरटे पसार झाले, याप्रकरणी भूमिका बाफना यांनी उपनगर पोलिस ठाण्यात आज तक्रार दाखल केली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com