मालेगाव : क्वॉरंटाईन रूग्णाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला
नाशिक

मालेगाव : क्वॉरंटाईन रूग्णाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

पावणे सहालाखांचा एैवज लांबवला

Gokul Pawar

Gokul Pawar

मालेगाव । Malegoan

करोना बाधिताच्या संपर्कात आल्यामुळे संपुर्ण कुटूंब अजमीरसौंदाणे येथील उपचार केंद्रात दाखल असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची फळी कापून घरात प्रवेश करीत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 5 लाख 60 हजार रूपयांचा एैवज लंपास केला. या धाडसी घरफोडीने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात संदीप गांगुर्डे यांनी फिर्याद दाखल केली आहे. गावातील त्यांचे काका रघुनाथ तुळशीराम गांगुर्डे यांच्यासह परिवार अजमीरसौंदाणे येथील करोना उपचार केंद्रात उपचारासाठी दाखल आहेत. घरात कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने रात्रीतून घराच्या पाठीमागील दरवाजाची लाकडी फळी कापून आत प्रवेश केला.

घरातील स्टिलच्या डब्यात ठेवलेले 3 लाख 10 हजाराचे सोन्या-चांदीचे दागिने व 2 लाख 50 हजाराची रोकड असा सुमारे 5 लाख 60 हजार रूपयांचा एैवज घेवून चोरटे फरार झाले.

याप्रकरणी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपअधिक्षक शशिकांत शिंदे, पो.नि. गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. अधिक तपास सपोनि पाटील हे करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com