नाशकात पुन्हा घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास

नाशकात पुन्हा घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पाईपलाईन रोडवरील (Pipeline Road) एका बंद फ्लॅटचे दार उघडून अज्ञात चोरट्याने लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला...

याबाबत पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार मंगला रमेश बळेल (Mangala Ramesh Balel) (७४, रा. फ्लॅट नंबर ३०३, ओंकार रेसिडेन्सी, पाईपलाईन रोड, फॉग सिटी हॉटेल जवळ, गंगापूर, नाशिक) यांच्या बंद फ्लॅटचे अज्ञात चोरट्याने कुलूप कशाच्या तरी सहाय्याने तोडून कपाटात ठेवलेले दोन लाख सात हजार पाचशे रुपयांचे सोन्याचे विविध प्रकारचे दागिने चोरून नेले.

याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक गिरीश महाले (Girish Mahale) करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com