दरोडेखोरांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग ; एकास अटक

दरोडेखोरांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग ; एकास अटक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आज पहाटे 4.30 च्या सुमारास कसारा घाटात ( Kasara Ghat )बंद पडलेल्या वाहनचालकांना मारहाण करून लुटणाऱ्या दरोडेखोरांना ( robbers) अर्धा तासाच्या थरार नाट्या नंतर एका आरोपीस पकडण्यास पोलिसांना यश आले या झटापटीत एक जिगरबाज पोलीस कर्मचारी ( Police Injured )जखमी झाले .

नाशिक दिशेहून मुबई कडे लोखंडी प्लेट घेऊन जाणारा ट्रुक क्रमांक एम एच 40 बी जी 6165 हा रात्री च्या सुमारास नवीन कसारा घाट उतरत असताना घाटात गाडीचा पाटा तुटला म्हणून महामार्ग पोलिसाच्या मदतीने रात्रीच्या वेळी सदर ट्रक रस्त्याच्या बाजूला लावून ठेवण्यात आला रात्रीच्या वेळी गॅरेज उपलब्ध होत असल्याने ट्रक चालकास महामार्ग पोलिसांनी मोबाईल नंबर दिला व पोलीस गस्ती साठी निघून गेले.

पहाटे 4.30 सुमारास ट्रक जवळ एका पल्सर गाडी वर तीन जन आले पूर्ण काळे कपडे परिधान केलेल्या या तीन तरुणांनी गाडीतील चालकास आवाज देत उठवले व दादागिरी करीत ट्रक वर दगडफेक केली ट्रक चालकाने प्रसंगवधन राखीत महामार्ग पोलिसांना कॉल केला तो पर्यंत ह्या तीन तरुणांनी ट्रक मध्ये चढून ट्रक चालक विकी खोब्रागडे व क्लीनर निधी वासनिक ह्यांना बेदम मारहान करीतत त्यांच्या कडील रोख रक्कम व मोबाईल हिसकावून घेतले.

त्याच दरम्यान महामार्ग पोलीस घोटी केंद्र ( Highway Police Center- Ghoti ) चे माधव पवार,मुरलीधर गायकवाड,दीपक दिंडे व संजय नंदन हे तिथे पोहचले पोलीस आल्याचे समजताच लुटारूंनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांवर हल्ला चडविण्याचा प्रयत्न करीत जंगलात पळ काढला याचं दरम्यान तीन3 पैकी एका मुख्य सूत्रधार असलेल्या विजय रामदास ढमाळे रा.इगतपुरी याला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले पोलीस हवालदार मुरलीधर गायकवाड यांनी त्याला पकडून ठेवल्याने दरोडेखोर विजय ढमाळे याने पोलीस कर्मचारी गायकवाड यांच्यावर धारधार हत्याराने हल्ला चडवला त्यात ते जखमी झाले त्याच दरम्यान अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद करीत त्याला तब्यात घेतले. व कसारा पोलिसांच्या तब्यात दिले.आरोपी कडे असलेली दुचाकी MH 15 HB 1075 देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

कसारा घाटात पोलिसाच्या मदतीसाठी.......

दरम्यान कसारा घाटात धारधार शस्त्र घेऊन लुटमार करणारी टोळी वाहंचालकांना दादागिरी व मारहान करीत असून महामार्ग पोलिसां वर सुद्धा दगडफेक करीत असल्याची माहिती मिळताच कसारा पोलीस ठाण्याचे पी एस आय सलमान खतीब ,व पोलीस कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन टीम चे सदस्य मदतीला पोहचले परंतु तो पर्यंत 2 जन पळून गेलेले तर एका आरोपीस महामार्ग पोलिसांनी पकडून ठेवले होते.

मात्र पहाटे च्या अंधारात घडलेल्या अर्धा तासाच्या या थरार नाट्यात शस्त्र धारी दरोडेखोरांशी दोन हात करणाऱ्या महामार्ग पोलिस व कसारा पोलिसांचे कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.