सोमवारपासून देवळालीचे रस्ते खुले होणार

सोमवारपासून देवळालीचे रस्ते खुले होणार

देवळाली कॅम्प | Deolali Camp

पोलीस आयुक्त (Police Commissioner) यांचे आदेशानुसार करोना काळात देवळाली कॅम्प (Deolali Camp शहरातील अंतर्गत रस्ते बंद (City Road Closed) करण्यात आले होते.

सदर रस्ते सोमवार पासून पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती शिवसेना तालुका संघटक चंद्रकांत गोडसे (Shivsena Leader Chandrakant Godse) यांनी दिली.

याबाबत चंद्रकांत गोडसे व कॅन्टोमेंट बोर्डच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका आशा गोडसे (Ex Corporater Asha Godse) यांनी देवळाली कॅम्पचे व पो नी कमलाकर जाधव याची भेट घेऊन देवळाली कॅम्प परिसरात करोना काळात पोलिसांनी केलेले काम उत्तम असल्याचे सांगितले.

शिवाय सद्यपरिस्थितीत येथील करोना स्थिती (Corona Crisis) आटोक्यात आलेली असून नाशिक, नाशिकरोड भागात ज्या प्रमाणे रस्ते खुले करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे येथील रस्ते खुले करून जनतेला दिलासा देण्याची मागणी केली.

याबाबत वरिष्ठांच्या आदेशानुसार सोमवारी रस्ते खुले करीत असल्याचे सांगण्यात आले. रस्ते खुले होणार असले तरी करोना अद्याप पूर्ण पणे गेलेला नसल्याने नागरिकांनी शासनाचे नियमांचे पालन करण्याचे आवाहन गोडसे यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com