सातपूर परिसरातील रस्त्यांवर पाणीच पाणी

सातपूर परिसरातील रस्त्यांवर पाणीच पाणी

नाशिक | Nashik

गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) उघडीप दिली होती. मात्र, आज दोन वाजेच्या सुमारास आलेल्या पावसाने अवघ्या तासाभरात शहराला चांगलेच झोडपून काढल्याने रस्त्यांवर (Road) पाणीच पाणी (water) साचल्याचे पाहायला मिळत आहे...

आजच्या पावसामुळे सातपूर (Satpur) येथील अंबड लिंक रोडवरील (Ambad Link Road) दत्त मंदिर चौफुलीजवळ रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुक कोंडी झाली होती. तर महात्मा नगर बस स्टॉपसमोर (Mahatma Nagar Bus Stop) नेहमीप्रमाणे पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, आजच्या पावसामुळे शहरातील बऱ्याच भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र आहे. याशिवाय आयटीआय सिग्नल (ITI Signal) परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com